Vaan Project Akola  sakal
विदर्भ

Vaan Project Akola : वरदान प्रकल्प@ ९५.१८ वारी येथील श्री हनुमान सागरमध्ये पाण्याच्या पातळीत मोठी वाढ

अकोला, अमरावती, बुलढाणा या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेला हिवरखेड नजीकचा वारी हनुमान येथील वान प्रकल्पाची पाणी पातळी ९५ टक्के झाली

धीरज बजाज

हिवरखेड : अकोला, अमरावती, बुलढाणा या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेला हिवरखेड नजीकचा वारी हनुमान येथील वान प्रकल्पाची पाणी पातळी ९५ टक्के झाली आहे. ता. २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता प्रकल्पाने निर्धारित पाणी साठवण क्षमता गाठली आहे.

वान प्रकल्प पाणी पातळी ४११.१९ मीटर असून, ९५.१८ टक्के पाणीसाठा झाला आहे. वान प्रकल्पाच्या मंजूर जलाशय परिचालन सुची नुसार प्रकल्पामध्ये सप्टेंबरअखेर ९५.२४ टक्के पाणी साठा असणे निर्धारित आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असून, धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने येणाऱ्या येव्या नुसार कोणत्याही क्षणी वक्रद्वार प्रचलित करून पुराचे पाणी नदीपात्रामध्ये सोडण्याचा निर्णय घेण्यात येईल.

त्यामुळे नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सावध राहावे तसेच नदी पात्र ओलांडू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. नदीकाठावरील गावांना आपल्या स्तरावरून सतर्क करण्यात यावे, असे आवाहन वान प्रकल्प पूर नियंत्रण कक्ष वान प्रकल्प शाखा अभियंता नयन लोणारे यांनी केले आहे.

प्रकल्पाची १०० टक्क्यांकडे वाटचाल

अकोला जिह्यात प्रसिद्ध वारी हनुमान येथील हनुमान सागर प्रकल्प परिसरात मागील बारा तासापासून मुसळधार व सततधार पावसामुळे सद्यस्थितीत हनुमान सागर वान प्रकल्पात ९५.१८ टक्के जलसाठा असल्याची माहिती वान प्रकल्प शाखा अभियंता नयन लोणारे यांनी दिली. यावर्षी सुद्धा श्री हनुमान सागर पूर्णता भरल्यामुळे शेतकऱ्यांना रब्बीत सिंचनासाठी पाणी मिळू शकेल. सोबतच शेकाडो गावातील नागरिकाच्या पिण्याची तहान भागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

SCROLL FOR NEXT