छायाचित्र
छायाचित्र 
विदर्भ

भय्या, ये दिवार तुटती क्‍यो नहीं!

सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः महापालिकेने शिकस्त घोषित केलेले पूनम मॉलचे बांधकाम पाडण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचा ताफा जेसीबी, ट्रक आदीसह पोहोचला. मात्र, दिवसभराच्या अथक प्रयत्नानंतरही महापालिकेच्या पथकाला बांधकाम पाडण्यात यश आले नाही. शिकस्त घोषित केलेले बांधकामही तोडण्यासाठी यंत्रणा अपुरी पडल्याने आज येथे जमलेल्या नागरिकांनी "भैय्या ये दिवार तुटती क्‍यो नहीं' असा टोला महापालिकेला लगावला.

वर्धमाननगरातील पूनम मॉलचे स्लॅब कोसळल्याने गुरुवारी रात्री सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला. त्यानंतर शुक्रवारी महापालिकेने बांधकामाची पाहणी करून पूनम मॉल इमारतीतील 7142.20 चौ. मी. क्षेत्रफळाचे बांधकाम शिकस्त घोषित करून 24 तासांत पाडण्यासंदर्भात नोटीस बजावली. मात्र, पूनम मॉल प्रशासनाने बांधकाम पाडले नसल्याने महापालिकेचे पथक जेसीबी, ट्रक आदी यंत्रणा व लकडगंज पोलिस ताफ्यासह आज सकाळी 11 वाजता वर्धमानगरात पोहोचले. पथकाने इमारतीचे बांधकाम तोडण्यासाठी पाहणी केली. उंच भिंतींमुळे पथकाने अग्निशमन विभागातील उंच ठिकाणी पोहोचण्यासाठी असलेले अग्निशमन विभागातील टीटीएल वाहन मागविले. टीटीएल वाहनाने पथकातील कर्मचाऱ्यांना इमारतीपर्यंत पोहोचविण्यात आले. परंतु, इमारत पाडताना मोठी जोखीम असल्याने दिवसभराच्या प्रयत्नानंतरही महापालिकेच्या पथकाला बांधकाम तोडण्यात अपयश आले. महापालिकेच्या पथकात अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त अशोक पाटील, निरीक्षक संजय कांबळे, माळवे, पाटील आदींचा समावेश होता. दरम्यान, स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी कामाची पाहणी केली.

मेट्रोचे असहकार्य
पूनम मॉलचे बांधकाम तोडण्यासाठी महापालिकेकडे अत्याधुनिक यंत्रणा नाही. त्यामुळे महापालिकेने महामेट्रोकडे मदतीची याचना केली. परंतु, महामेट्रोनेही सहकार्य केले नसल्याचे सूत्राने नमूद केले. दरम्यान, महामेट्रोने या इमारतीच्या स्लॅब कोसळण्यासोबत मेट्रो स्टेशन बांधकामाची काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले.
आज पुन्हा करणार कारवाई
आज दिवसभराच्या प्रयत्नानंतरही अपयश आल्याने महापालिकेचे पथक उद्या, सोमवारी पुन्हा इमारत पाडण्याची प्रक्रिया करणार असल्याचे मनपा पथकातील एका अधिकाऱ्याने नमूद केले. उद्या, संपूर्ण अत्याधुनिक पोकलेनसह यंत्रणा मागविण्यात येणार असून दिवसभरात संपूर्ण बांधकाम पाडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

Australia Squad T20 WC 24 : ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा! ODI वर्ल्डकप जिंकवणाऱ्या पॅट कमिन्सऐवजी 'या' खेळाडूकडे कर्णधारपदाची माळ

'..तर तुम्हाला महाराष्ट्रात येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही'; मनोज जरांगे-पाटलांचा थेट कर्नाटक सरकारला इशारा

Manipur : मणिपूरमधील 'त्या' महिलांना पोलिसांनीच केलं जमावाच्या स्वाधीन; CBI चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT