file photo
file photo 
विदर्भ

मुलीच्या प्रियकराचा पिता-पुत्राकडून खून

सकाळवृत्तसेवा

घुग्घुस (जि. चंद्रपूर) : मुलीच्या प्रियकराची तिचे वडील आणि भावाने मिळून खून केल्याची खळबळजनक घटना रविवारी (ता. 12) रात्री उघडकीस आली. आरोपींनी खुनानंतर पोलिसांपुढे शरणागती पत्करली. योगेश जाधव (वय 23), असे मृताचे नाव आहे. आरोपी प्रभुदास दुर्वे, कृष्णा धुर्वे आणि योगेश घुग्घुस येथील रहिवासी आहेत.
प्रभुदास दुर्वे यांच्या मुलीशी योगेशचे प्रेमसबंध होते. त्यांच्या मुलीने प्रियकर योगेशला दूरध्वनी केला. भेटण्यासाठी वणी येथे बोलावले. तीसुद्धा एसटीने आपल्या नातेवाइकांना सोबत घेऊन वणीला निघाली. मात्र, ती चारगाव चौकी येथेच एसटीतून उतरली. तिथे योगेश मोटारसायकल घेऊन तिची प्रतीक्षा करीत होता. त्याचवेळी अचानक तिचे वडील प्रभुदास आणि भाऊ कृष्णासुद्धा मोटारसायलकने तिथे पोहोचले. योगेशला जबरदस्तीने आपल्या मोटारसायकलवर बसविले. वेकोलिच्या निलजई कोळसा खाणीच्या जवळील रस्त्याच्याकडेला त्याला झुडपात नेले. तिथे बेदम मारहाण केली. मारहाणीने तो बेशुद्ध झाला. तो जिवंत आहे की मृत याची माहिती तोपर्यंत दोघांनाही नव्हती. मात्र, त्याला त्यांनी झाडांच्या फांद्या तोडून झाकून ठेवले. त्यानंतर घुग्घुस येथे रात्री नऊ वाजता ते परतले. त्यानंतर दोघेही थेट घुग्घुस पोलिस ठाण्यात पोहोचले.
माझ्या मुलीची छेडखानी करणाऱ्या योगेशला निलजई खाणीच्या झुंडपी जंगलात मारहाण करून सोडून दिले, अशी कबुली त्यांनी पोलिसांकडे दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोचले. रक्तबंबाळ योगेश झाडाझुडपांनी झाकून होता. त्याचा मृत्यू झाला होता. योगेश जाधवकडे एक भ्रमणध्वनी सापडला. त्यात सीमकार्ड नव्हते. दुर्वे पितापुत्रांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे रविवारला दुपारीच मित्राने योगेश बेपत्ता असल्याची पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती. या खून प्रकरणात दुर्वे पिता-पुत्रासोबत आणखी कुणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिस करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli Blast: "माझ्या पत्नीचा मृतदेह तिच्या अंगठीने ओळखला"; डोंबिवली स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या रिद्धीच्या पतीचा दुःखद अनुभव

Pushpa 2: 'पुष्पा-2'मध्ये समंथा नाही तर 'ही' अभिनेत्री करणार आयटम साँगवर डान्स? चर्चांना उधाण

सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले बंदरात बोट उलटून 7 खलाशी बुडाले, 4 जणांचा मृत्यू

Indapur Crime News : इंदापूर येथे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञाताने केला हल्ला

Latest Marathi News Live Update: पुणे पोर्श प्रकरणात पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का याचा तपास सुरु: पुणे पोलीस आयुक्त

SCROLL FOR NEXT