dcm devendra fadnavis says ladki bahin yojana first installment after 15th august Sakal
विदर्भ

Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ चा पहिला हप्ता १५ ऑगस्टनंतर - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री फडणवीस ः वरुड येथे भाजप कार्यकारिणीचे महाअधिवेशन

सकाळ वृत्तसेवा

वरुड : लाडकी बहीण योजनेने विरोधक घाबरलेले आहेत. याबाबत नकारात्मक प्रचार सुरू आहे. या योजनेचे पैसे कोठून आणणार0 हा सवाल विरोधकांना पडला आहे. आम्ही पैसे देणारच आहो, १५ ऑगस्टनंतर लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता वितरित केला जाणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

शहरातील रामदेवबाबा मंगल कार्यालयात राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित जिल्हा ग्रामीण भाजप कार्यकारिणीच्या महाअधिवेशनात ते बोलत होते. व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,

राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे, माजी खासदार नवनीत राणा, आमदार प्रताप अडसड, माजी आमदार केवलराम काळे, प्रभुदास भिलावेकर, रमेश बुंदिले, किरण पातूरकर, मोर्शी विधानसभा निवडणूक प्रमुख डॉ. मनोहर आंडे, ज्योती मालवीय, डॉ. वसुधा बोंडे, भाजप प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी, आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री महायुतीचाच होणार. भाजप हा महाराष्ट्रातील सर्वांत मोठा पक्ष असेल. गेल्या निवडणुकीत विरोधकांनी मोठ्या निगेटिव्ह अफवा पसरविल्यामुळे आपल्याला काही ठिकाणी जागा कमी मिळाल्या, याची खंत आहे. त्याला उत्तर देऊ शकलो नाही, त्याचा परिणाम मतांमध्ये झाला. योजनांबाबत संभ्रम पसरविला गेला. संविधानाचा खोटा प्रचार केला, आरक्षणाचा अपप्रचार केला गेला, असेही ते म्हणाले.

संत्राउत्पादक शेतकऱ्यांना निर्यातीबाबतचे अनुदान दिले जाणार आहे. वैनगंगा-नळगंगा प्रकल्प मंजूर करून विदर्भाचे चित्र बदलले जाईल. विरोधकांच्या अपप्रचाराला बळी न पडता आपली भूमिका तटस्थपणे मांडा व महायुतीचे सरकार आणण्यासाठी मैदानात उतरा, असे आवाहन यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

यावेळी बोलताना खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी विरोधकांनी खोटे बोलून बोलून लोकसभा निवडणुकीत काही ठिकाणी आपला पराभव केला, परंतु खोटं जास्त दिवस टिकत नसते, त्यामुळे आता कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. संचालन भाजप तालुकाध्यक्ष राजकुमार राऊत यांनी, तर प्रास्ताविक खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केले. आभार माजी पं. स. सदस्य अंजली तुमडाम यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT