विदर्भ

आठवडाभरात दुसऱ्या हत्तीचा मृत्यू; देखभालीसंदर्भात शंका

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : राज्यात प्रसिद्ध असलेल्या एकमेव शासकीय हत्ती कॅम्प कमलापूर येथे शुक्रवारी (ता. ६) आणखी एका हत्तीचा दुपारच्या सुमारास मृत्यू झाला. सलग दुसऱ्या हत्तीच्या मृत्यूने वनविभाग तसेच वन्यजीव प्रेमींमध्ये खळबळ उडाली आहे. मृत्यू झालेल्या हत्तीचे नाव अर्जुन असून, तो दीड वर्षाचा होता. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. एकाच आठवड्यात दोन हत्तींच्या मृत्यूने हत्ती कॅम्पमधील हत्तींच्या देखभालीसंदर्भात शंका उपस्थित केली जात आहे.

अवघ्या चार दिवसांपूर्वी मंगळवारी (ता. ३) पहाटे सई नावाच्या तीन वर्षांच्या मादी हत्तीचा मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूचे नेमके कारण अजूनही अस्पष्ट असताना व शुक्रवारी आणखी एका हत्तीचा मृत्यू झाला. आठवड्याभरात दोन हत्तीचा मृत्यू झाल्याने दोन हत्तींच्या मृत्यूची चौकशी करण्याची नामुष्की सिरोंचा वनविभागावर ओढवली आहे.

यापूर्वी २९ जून २०२० रोजी ‘आदित्य’ नावाच्या ४ वर्षीय हत्तीचा मृत्यू झाला होता. ११ जून २०२० रोजी आदित्य हा चिखलात अडकला आणि त्याची प्रकृती बिघडली होती. वनविभागाने त्याच्यावर उपचार सुरू केले होते. मात्र, कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे त्याचा मृत्यू झाला होता. त्याचवेळी कमलापूर वनपरिक्षेत्राच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

शुक्रवारी मृत्यू झालेल्या हत्तीचे नाव ‘अर्जुन’ असून, मंगला या हत्तीणीने १५ जानेवारी २०१९ ला मकर संक्रांतीच्या दिवशी त्याला जन्म दिला होता. केवळ दीड वर्षाचा असलेल्या या हत्तीच्या मृत्यूचे कारण गुलदस्त्यात आहे. सिरोंचा वनविभागाअंतर्गत येत असलेल्या अहेरी तालुक्यातील कमलापुरातील शासकीय हत्ती कॅम्पमध्ये हत्तीच्या देखभालीकडे दुर्लक्ष व आरोग्याबाबत हेळसांड होत असल्याचा आरोप वन्यजीवप्रेमींकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्याला सलग चौथ्या दिवशी पावसानं झोडपलं, घरांमध्ये शिरलं पाणी; काही ठिकाणी गारपीट

Latest Marathi News Live Update : पुणे शहराला अवकाळी पावसाने झोडपले

Talwar Baba: भयंकर! तंत्र-मंत्र आणि भीतीचा खेळ... महाराष्ट्रातील ‘तलवार बाबा’चा काळा चेहरा उघड; 'असं' करायचा शोषण

He Kay Navin Review: 'हे काय नवीन' मध्ये खरंच काही नवीन आहे का? कशी आहे प्रिया उमेशची नवी वेब सीरिज?

Samruddhi Expressway Accidents : काय आहे 'हायवे हिप्नोसिस'? समृद्धीवर का होतायत अपघात? पूल ठरतात धोकादायक!

SCROLL FOR NEXT