विदर्भ

पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

संतोष मुडे

उमरखेड (जि. यवतमाळ) : जुगाराच्या अडड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी मारहाण केल्याने शौचास जात असलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता.4) दुपारी एकच्या दरम्यान तालुक्यातील बोरी येथे घडली. 

संजय बुरकुले (वय 35, रा. बोरी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. बोरी हे गाव दराटी पोलिस ठाण्याअंतर्गत बंदीभागात येते. येथे नेहमीच जुगार भरत असल्याचे बोलले जाते.

आज दराटी पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी जुगारावर छापा टाकण्यासाठी गेले होते. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. तर काही पळून गेल्याने पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. दरम्यान, संजय हा शौचास जात होता. त्याला अडवून कुठे पळून जात आहे, अशी विचारणा केली. एका पोलिस कर्मचार्‍याने कोणताही विचार न करता तरुणाला मारहाण केली. यात तो खाली कोसळला. त्याची प्रकृती अत्यवस्थ झाल्याचे लक्षात येताच तत्काळ उपचारासाठी किनवट येथील शासकीय रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही वार्ता गावात धडकताच ग्रामस्थांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. मारहाण करणार्‍या पोलिस कर्मचार्‍याला नागरिकांनी एका खोलीत कोंडून ठेवल्याचे समजते. गावात तणाव असल्याने पोलिस प्रत्येक घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. किनवट येथील रुग्णालयात संजय यांच्या शवविच्छेदन सुरू होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : पूँचमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 जवान शहीद, 4 जखमी

SCROLL FOR NEXT