संग्रहित छायाचित्र 
विदर्भ

"त्या' केंद्रावरील वितरित सर्व आधार कार्डची तपासणी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : आपले सेवा केंद्रावर बोगस आधार कार्ड तयार करण्यात येत असल्याचे उघड झाल्यानंतर आता "त्या' केंद्रावरून वितरित करण्यात आलेल्या सर्व आधार कार्ड आणि शासकीय कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील पथकाने हंसापुरी येथील एका केंद्रावर धाड घालून बोगस आधार केंद्र समोर आणले होते. या प्रकरणी
चंद्रकांत पराते, वय 35 वर्षे, रा. पाचपावली रोड, बागल आखाडा व तुषार फुलचंद हेडाऊ, वय 19 वर्षे, रा. टिमकी, दादरापूल या दोघांच्या विरोधात तहसील कार्यालयात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. चंद्रकांत पराते यांना आपले सेवा केंद्र देण्यात आले आहे. आधार कार्डचेही काम देण्यात आले. पराते यांनी कामासाठी तुषार हेडाऊची नियुक्ती केली. आधार कार्ड मशीनच्या वापरासाठी पराते यांना एक विशिष्ट "ओळख' देण्यात आली होती. या ओळखच्या आधारे नवीन आधार कार्ड तयार करणे व त्यात दुरुस्ती करता येत होती. पराते यांनी या "ओळख'ने एक रबरी स्टॅम्प तयार केले. यामुळे ते नसतानाही तुषारकडून मशीनचा उपयोग करण्यात येत होता. या केंद्रावरून बनावट आधार कार्ड तयार करण्यात येत असल्याचे मुंबई येथील आयटी सेलच्या लक्षात आले. त्यांनी जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल व जिल्हा आयटी सेलचे प्रकल्प व्यवस्थापक उमेश घुग्गुसकर यांना माहिती दिली. उमेश घुग्गुसकर यांनी केंद्रावर धाड घातली. त्यांच्यासोबत नायब तहसीलदार प्रभाकर कुबडे व संदीप कोहळेसोबत होते. येथे विशेष "ओळख'चा रबरी स्टॅम्प मिळाला. बोगस आधार तयार करण्याप्रकरणी तहसील पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या केंद्रावरून मोठ्या प्रमाणात बोगस आधार कार्डसोबत इतर कागदपत्रे तयार करण्यात आल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आता या केंद्रावरून तयार करण्यात आलेले सर्व आधार कार्ड आणि कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russia Ukraine War : रशियाचा भारतीय कंपनीच्या औषध प्रकल्पावर ड्रोन हल्ला; एकाचा मृत्यू, मोठे नुकसान

माढ्यात आढळला दीडशे वर्षे 'लुप्त' मानल्या गेलेल्या प्रजातीतील जीव; ३६० अंशात पाहणारा 'इंद्रधनुष्य कोळी' शोधला!

Delhi News: जंतर-मंतरवर आंदोलनात खळबळजनक घटना! पोलिसांकडून महिला पत्रकाराचा लैंगिक छळ

Latest Marathi News Live Update : आम्ही काही 'व्होट बँक' नाही आणि आम्हाला आमचे हक्क मिळालेच पाहिजेत: असदुद्दीन ओवेसी

Stone Crusher: मलठणमध्ये स्टोन क्रशरच्या ब्लास्टिंगचा फटका; शेतजमिनींसह हजारो फळझाडांचे नुकसान

SCROLL FOR NEXT