delta plus e sakal
विदर्भ

डेल्टा प्लस रुग्णांच्या कॉन्टक्ट ट्रेसिंगवर भर

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : जिल्ह्यात डेल्टा प्लस आढळलेल्या सहा रुग्णांच्या संपर्कातील सुमारे शंभर ते दीडशे जणांचे कॉन्टक्ट ट्रेसिंग करण्यात येणार आहे. यासोबतच संबंधित रुग्णांच्या कार्यक्षेत्रात कोविड बाधित रुग्ण किंवा अशा रुग्णाचा मृत्यू झाला आहे का? तेसुद्धा शोधण्याची मोहीम युद्धस्थरावर राबविण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

अमरावती जिल्ह्यात सहा डेल्टा प्लस पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी तीन रुग्ण महापालिका क्षेत्रातील तर तीन ग्रामीण भागातील आहेत. यामध्ये मनपा क्षेत्रातील मोहननगरमधील दोघे पती-पत्नी, तर एक ५८ वर्षीय रुग्ण अर्जूननगर येथील रहिवासी आहे. उर्वरित तीन रुग्णांमध्ये मोर्शी तालुक्यातील कोळविहीर येथील ५५ वर्षीय रुग्ण, तर वरुडमधील ३२ वर्षीय महिलेसह चांदूरबाजार तालुक्यातील बोराळा येथील ६५ वर्षीय रुग्णाचा समावेश आहे.

आरोग्य विभागाकडून कोविडग्रस्त रुग्णांचे सॅम्पल जिनामिक सिक्वेंसिंगसाठी राज्यस्तरावर पाठविण्यात आले होते. त्यापैकी सहा रुग्णांचे सॅम्पल डेल्टा प्लस न्यूटेशनसाठी पॉझिटिव आल्याचा अहवाल आला आहे. त्यामुळे प्रत्येक डेल्टा प्लस रुग्णामागे १०० ते १५० कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्याचे आदेश महापालिका आरोग्य अधिकाऱ्यासह ग्रामीण रुग्णालय, मोर्शी, वरुड व चांदूरबाजार येथील आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. यासोबतच संबंधित रुग्णाच्या रहिवासी परिसरात कोविड पॉझिटिव किंवा डेथ आहे का? तेसुद्धा तपासण्यात येणार आहे.

डेल्टा प्लस रुग्णाने मागील एक महिन्यात जिल्ह्यात, जिल्ह्याबाहेर व कशाने प्रवास केला, त्याच्या घरी जिल्हा अथवा बाहेरून कुणी या कालावधीत आले होते का? रुग्णाने कोविड १९ ची लस घेतली आहे का? त्याचा प्रकार, दिनांक व किती डोस घेतले. रुग्णाला लक्षणे आढळली ती तारीख व उपचार घेतल्याचा तपशील, तो रुग्ण व्यक्ती सुपर स्प्रेडर आहे का?, त्याच्या कुटुंबातील इतर व्यक्तींचे स्वॅब आरटीपीसीआरकरिता घेऊन प्रयोगशाळेत तातडीने पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

स्वतंत्र केस तयार करा

डेल्टा प्लस आढळलेल्या रुग्णाच्या रहिवासी परिसरात इली व सारी तसेच संशयित कोविडच्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्यासोबतच आणखीही काही सूचना व उपाययोजना सांगण्यात आल्या आहेत. महापालिका आणि ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य अधिकाऱ्यांनी डेल्टा प्लस रुग्णांची स्वतंत्र केस तयार करावी, अशाही सूचना आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT