विदर्भ

अमरावती : एका आठवड्यात तीन मुलांचा डेंगीने मृत्यू

प्रशिक मकेश्वर

तिवसा (जि. अमरावती) : शहरात आतापर्यंत चार जणांचा डेंगीमुळे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या असून, आरोग्याचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला आहे. गुरुवारी तिवसा नगरपंचायत येथील कर्मचाऱ्याच्या १३ वर्षांच्या मुलाचा अमरावती येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे डेंगीने तीन मुलांच्या मृत्यूसह हा आकडा पाचवर गेला आहे. कृष्णा सचिन गौरखेडे (वय १३) असे मृत मुलाचे नाव आहे.

शहरासह तालुक्यात डेंगी, सर्दी, खोकला, ताप अशा विविध आजारांची लागण होत असल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. अस्वच्छता, नागरिकांमध्ये जागरुकतेचा अभाव, वेळेवर उपचार न मिळणे, आजारपणाचे निदान न होणे व पैशाअभावी मृत्यूचा दर वाढत असल्याची चर्चा शहरात दिसून येत आहे. गेल्या आठवड्याभरात एकूणच चार जणांचा डेंगी या आजारामुळे मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

नगरपंचायत येथील कर्मचारी सचिन गौरखेडे यांच्या मुलाचा डेंगीमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. याआधी दोन रुग्णांचा यातच मृत्यू झाला असून शहरात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यामुळे शहरासह तालुक्यातील आरोग्याचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आल्याचे दिसून येत आहे.

नगरपंचायत प्रशासन वाढदिवस साजरे करण्यात मग्न

काही दिवसांआधी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी नगरपंचायतच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त करीत अधिकारी व कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली होती. मात्र, शहरात अस्वच्छतेमुळे विविध आजारांची लक्षणे यातून लहान मुलांचे मृत्यू होत असताना नगरपंचायत येथील अधिकारी व कर्मचारी वाढदिवस साजरे करण्यात मग्न असल्याची चर्चा शहरात आहे.

आरोग्य विभागाकडून यासंदर्भात उपाययोजना सुरू आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढतो आहे. तेव्हा यासंदर्भात सर्व जनजागृती व उपाययोजना करण्यासाठी निर्देश दिले आहेत. नागरिकांनीसुद्धा स्वच्छता ही आपली जबाबदारी समजून नाली व गटारांमध्ये जर पाणी साचलेले असेल तर ते वाहते करून घेतले पाहिजे आणि लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.
- डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT