file photo
file photo 
विदर्भ

Maharashtra Vidhansabha 2019 विधानसभेत 80 टक्के महिला उमेदवारांचे डिपॉजिट जप्त

राजेश प्रायकर


नागपूर : प्रत्येक क्षेत्रात महिला यशांचा झेंडा रोवत असल्या तरी राजकारणात घराणेशाहीचा अपवाद वगळता महिलांना नगण्य स्थान असल्याचे चित्र आहे. मागील विधानसभा निवडणुकीत 277 महिला उमेदवारांपैकी केवळ 20 महिलांना विधानसभेत पोहोचण्यात यश आले. विधानसभेत महिला पोहोचण्याची टक्केवारी केवळ सात आहे. 80 टक्के महिला उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झाल्याने अद्याप पुरुषप्रधान संस्कृतीत महिला नेतृत्वाचा स्वीकार केला जात नसल्याचेच अधोरेखित झाले. विशेष म्हणजे राजकीय पक्षांकडूनही महिलांना उमेदवारी देण्यात हात आखडता घेण्यात आला.
देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपती, पंतप्रधानपदापर्यंत महिला पोहोचल्याच नाही तर त्यांनी जागतिकस्तरावर कामगिरीचा ठसा उमटविला. सद्यस्थितीतही राजकारणात काही महिलांची कामगिरी उत्तम आहे. मात्र, अशी संधी मिळणाऱ्या महिला केवळ बोटावर मोजण्याइतपत आहे. यातही राजकीय वारसा लाभलेल्या महिलांना लवकर संधी मिळत असल्याचे दिसून येत आहे. मागील 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत 4 हजार 119 उमेदवार रिंगणात होते. यात 277 महिला उमेदवार होत्या. भाजपने 19, शिवसेनेने 13, कॉंग्रेसने 23, राष्ट्रवादी कॉंग्रेसने 18, मनसे व बसपने प्रत्येकी 14 महिलांना उमेदवारी दिली. सपा, रिपाइं (आ) यासह इतर लहान पक्ष व सव्वाशेवर अपक्ष महिला उमेदवार होत्या. 277 महिला उमेदवारांपैकी 224 महिला उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झाले. यात प्रमुख पक्षांच्या महिला उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात मते घेतली असली तरी 101 अपक्ष महिलांसह सप, बसपसह इतर लहान पक्षाच्या सर्वच महिला उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झाले. एकूण महिला उमेदवारांची संख्या बघता 80 टक्के महिलांचे डिपॉजिट जप्त झाले. ज्या सात टक्के महिला उमेदवारांना विधानसभा गाठण्यात यश मिळाले, त्यात घराणेशाहीचा मोठा वाटा असल्याचे दिसून येत आहे. मागील निवडणुकीत विविध पक्षांच्या महिला उमेदवारांचेही डिपॉजिट जप्त झाले. यात कॉंग्रेसच्या 14, भाजपच्या 3, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 8, शिवसेनेच्या 9, मनसेच्या 13 तर बसपच्या 14 महिला उमेदवारांचा समावेश आहे.
53 महिलांना डिपॉजिट वाचविण्यात यश
मागील निवडणुकीत 20 महिलांना विधानसभा गाठण्यात यश आले. 33 महिला उमेदवार दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानी होत्या. या महिलांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांपुढे चांगलेच आव्हान उभे केले. कॉंग्रेसच्या 3, भाजपच्या 3, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सहा, शिवसेनेच्या 4 महिला उमेदवार दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानी होत्या. राजकीय पक्षाच्या पाठबळामुळे या महिलांना प्रतिस्पर्ध्यापुढे आव्हान उभे करता आले. परंतु, अपक्ष किंवा ताकद नसलेल्या सप, बसपसह इतर पक्षांच्या महिला उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झाले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: वडेट्टीवारांचे आरोप खरे, उज्वल निकम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; एस. एम. मुश्रीफ यांची मागणी

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

SCROLL FOR NEXT