Dhangar samaj 
विदर्भ

धनगर कुटुंबाची दिवाळी शेताच्या बांधावरच 

बादल वानकर

समुद्रपूर (जि. वर्धा) : अद्यापपर्यंत परतीच्या पावसाचा धिंगाणा सुरूच असल्याने दिवाळी कधी आली अन्‌ कधी गेली कळलेच नाही. सतत येणाऱ्या पावसाने गत काही दिवसांमध्ये दाणादाण उडाली. अजूनही त्यातून आम्ही सावरलो नाही. आमच्या घरीही दिवाळीच्या चकल्या, चिवडा, लाडू, करंज्या होतात. पण, यंदा पावसाने उसंतच दिली नाही. पावसापासून बचावातच अख्खा काळ गेला. यंदाची दिवाळी आमच्यासाठी हालअपेष्टांचीच ठरली, अशी व्यथा धनगर समाजातील महिलांनी व्यक्त केली. 
तालुक्‍यातील काही भागात अनेक वर्षांपासून काही धनगर कुटूंब शेळ्या-मेंढ्यांना घेऊन येतात. ते या भागात वास्तव्य करतात. यंदा तालुक्‍यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे दिवाळीसणाकरिता आपल्या गावी जाता आले नाही. या पावसामुळे शेताच्या बांधावरच राहत असलेल्या झोपड्यांमध्ये दिवाळी साजरी करावी लागली. अतिपावसामुळे शेतजमिनी ओल्या झाल्या आहेत. अनेक वेळा मेंढपाळाच्या पालांमध्ये पावसाचे पाणी शिरून त्यांच्या शेळ्या-मेंढ्या, जनावरे, लहान मुलांचे हाल झाले. दिवाळीमध्ये आम्ही पण लाडू, चिवडा इत्यादी फराळाचे करतो. परंतु, या पावसाने अक्षरक्ष: धुमाकूळ घातला आणि आमच्या आनंदावर विरजण पडले. पावसामुळे या वर्षाची दिवाळी कायम आठवणीत राहील, अशी व्यथा धनगर बांधव मांडत आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT