तुळाणा गावाजवळील जीवाश्माची पाहणी करताना प्रा. चोपणे तुळाणा गावाजवळील जीवाश्माची पाहणी करताना प्रा. चोपणे
विदर्भ

चंद्रपूर : डायनासोरचे जीवाश्म आढळले; पायाचे व बरगडीचे हाड

चंद्रपूर जिल्ह्यातील पिजदुरा, गडचिरोली जिल्ह्यातील वडधम येथे यापूर्वी डायनोसरचे जीवाश्म आढळले आहे

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील तुळाणा गावाजवळून वाहणाऱ्या वर्धा नदीच्या (Wardha river) परिसरात डायनासोरचे जीवाश्म (Dinosaur fossils) आढळून आले. चार फूट लांब, एक फूट रुंद पायाचे हाड, तीन फूट लांब बरगडीचे हाड (found Bone) पाहता ते डायनोसोरचे असल्याचा दावा भूशास्त्र प्रा. सुरेश चोपणे (Pvt. Suresh Chopane) यांनी केला. चंद्रपूर जिल्ह्यातील पिजदुरा, गडचिरोली जिल्ह्यातील वडधम येथे यापूर्वी डायनोसरचे जीवाश्म आढळले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील भूभागावर ज्युरासिक काळात डायनोसोरचे अस्तित्व (existence of dinosaurs) होते. ज्युसासिक काळात येथील जलाशयात जलचर प्राण्यांचा वावर होता. महाकाय डायनोर या भागात अस्तित्वात असल्याचे पुरावे आढळले आहेत. जिल्ह्यातील पिजदुरा आणि गडचिरोली जिल्ह्यातील वडधम येथे डायनासोरचे जिवाश्म यापूर्वी आढळले. त्यामुळे अनेक अभ्यासक पिजदुरा येथे भेट देऊन जिवाश्मांचा अभ्यास करतात.

वरोरा तालुक्यात तुळाणा गाव आहे. या गावाजवळून वर्धा नदी वाहते. या भागातील विजय ठेंगणे, शाळकरी मुले नदी पात्रात फिरत होते. तेव्हा त्यांना हाड सदृश्य खडक आढळला. याची माहिती संशोधक प्रा. चोपणे यांना मिळाली. त्यांनी नदी परिसराला भेट देऊन पाहणी केली. तेव्हा ती हाडे जीवाश्म असून डायनोसोर किंवा हत्तीसारख्या मोठ्या प्राण्याची असावी असा अंदाज व्यक्त केला. चार फूट लांब, एक फूट रुंद पायाचे हाड, तीन फूट लांब बरगडीच्या हाडाचा आकार पाहता ते डायनोसोर असल्याचा अंदाज प्रा. चोपणे यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT