नागपूर : भाजपने शहरात एकाही महिलेला उमेदवारी दिली नसल्याने इच्छुकांच्या पदरी निराशाच आली आहे. किमान एक जागा महिलेसाठी सोडण्यात येईल अशी अपेक्षा सर्वांनाच होती.
पश्चिम नागपूरमधून महापौर नंदा जिचकार यांनी निवडणूक लढण्याची इच्छा दर्शवली होती. त्यादिशने त्यांनी कामलाही सुरुवात केली होती. पश्चिममधून डझनभर महिलांनी मुलाखती दिल्या होत्या. यात महापौर जिचकार यांचाही समावेश होता. त्यांच्या नावाची अनेक दिवसांपासून चर्चा होती. सुधाकर देशमुख यांना विश्रांती दिल्यास महापौरांनाच उमेदवारी दिली जाईल असेही भाजपचे कार्यकर्ते दावा करीत होते. यानिमित्ताने महापौरांच्या इनोव्हेशन पर्वाचीही चांगलीच चर्चा झाली होती. मात्र, येथून पुन्हा सुधाकर देशमुख यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. दक्षिण नागपूरमधून माजी महापौर अर्चना डेहनकर उत्सुक होत्या. त्यांनीही पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. त्या सध्या प्रदेश प्रवक्त्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दक्षिण-पश्चिम आणि कृष्णा खोपडे यांच्या पूर्व नागपूरमधून एकाही इच्छुकांनी मुलाखत दिली नव्हती. महिलांना सर्वाधिक अपेक्षा पश्चिम नागपूर त्यानंतर दक्षिण नागपूर येथून होती. जिल्ह्यातही भाजपने जाहीर केलेल्या तीनही विधानसभा मतदारसंघात महिला उमेदवारांचा समावेश नाही.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.