file photo
file photo 
विदर्भ

Vidhan Sabha 2019 : निवडणूक प्रचाराची पारंपरिक साधने हद्दपार 

सकाळ वृत्तसेवा

वेलतूर (जि. नागपूर) : आदर्श निवडणूक आचारसंहितेच्या अंमलबजावणीत निवडणूक प्रचाराची पारंपरिक साधने हद्दपार झाली असून त्याची जागा नव्या प्रचार यंत्रणेने घेतली आहे. विशेषत: सोशल मीडिया ही यात अग्रणी आहे. नव्या नव्या पोस्ट करून आपल्या उमेदवारांचे प्रचार करण्यात ते मश्‍गूल आहेत. त्याच्या प्रचाराचे जोरावर उमेदवारांचे भविष्य आहे.
प्रचार रथ, प्रचार वाहने व त्यावरील कर्कश आवाजात वाजणारे भोंगे बदलून त्याठिकाणी डिजिटल साउंड बॉक्‍स प्रचारात बाजी मारत आहेत. रिमोट कंट्रोल व रिमिक्‍स गाण्याच्या चाली मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोबतीला प्रचार वाहनावरील डिजिटल वॉल न्याहाळताना ग्रामीण मतदारांना सरकारच्या डिजिटल इंडियाच्या घोषणेची ग्वाही व आठवण करून देणारे आहे. मात्र, काही मतदारांना हाच काय तो डिजिटल इंडिया असा प्रश्न पडला आहे. 
आधुनिकीकरणात मिळेल तिथे भिंतीवर झाडावर आपल्या उमेदवारांचे निवडणूक चिन्ह काढून नारे देण्याची प्रथा नामशेष झाली आहे. एकेकाळी यातून मोठा हंगामी व्यवसाय उभा राहात होता. हा हंगामी व्यवसाय पार बुडाला आहे. या व्यवसायातील भिंत रंगविणारे कारागीर तर आजघडीला देशोधडीलाच लागले आहेत. आज त्याऐवजी डिजिटल फ्लेक्‍स बॅनर सर्व स्तरावर वापरले जात आहेत. कापडी बॅनरला मोठा व उत्कृष्ट पर्याय म्हणून सगळ्यांची त्याला पसंती आहे हे विशेष. सिनेमातील प्रसिद्ध गीताच्या चालीवरील प्रचारगीते सध्यातरी गल्ली बोळीतील मतदाराचे चांगलेच मनोरंजन करीत आहेत. सोबत कलापथके वेळेपुरती प्रचार यंत्रणा हलवून उमेदवारांची प्रचारधुरा मानधन तत्त्वावर सांभाळत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात डॉल्बी वाजवण्यास बंदी, प्रसासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT