file photo 
विदर्भ

वाढत्या रुग्णांमुळे जिल्हा प्रशासन हैराण; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक 

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : जिल्ह्यात सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. ही प्रशासन व नागरिकांसाठी चिंतेची बाब आहे. याबाबत प्रशासन "हायअलर्ट' मोडवर राहून काम करीत आहे. जिल्ह्यात रुग्णांची संख्या कमी करण्याबाबत प्रशासनाकडून करावयाच्या उपाययोजनेसंदर्भात जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी शनिवारी (ता.18) आढावा घेतला. 

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर. पी. सिंह, कोरोना नियंत्रण समन्वयक डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुळकर्णी, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. चव्हाण, उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी आदी उपस्थित होते. 

हे वाचा—गोंदियात आता रॅपिड अँटीजन तपासणी...कोरोनाचे होणार निदान...अंमलबजावणी सुरू
  

जिल्हाधिकारी सिंह म्हणाले की, शहरासोबतच मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात रुग्णांची संख्या वाढत आहे. नेर, दिग्रस, पुसद, दारव्हा येथील तालुकास्तरीय यंत्रणेने विशेष काळजी घ्यावी. शिवाय प्रभावी उपाययोजना राबवाव्यात. रुग्णांची संख्या न वाढण्यासाठी संबंधित गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, तहसीलदार आदींनी प्रतिबंधित क्षेत्राचा आढावा घ्यावा. नागरिकांच्या आरोग्यतपासणीवर विशेष लक्ष केंद्रित करावे. 

संशयित रुग्ण आढळले, तर त्यांचा स्वॅब त्वरित घ्यावा व कोणताही विलंब न करता तो प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठवावा. रॅपिड ऍन्टिजन टेस्टद्वारे आता रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. या किट आरोग्य विभागाने त्वरित उपलब्ध करून द्याव्यात किंवा संबंधित यंत्रणेने त्या खरेदी कराव्यात. आरोग्ययंत्रणेवरचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता संशयित रुग्णांना ठेवण्यासाठी मंगलकार्यालये, हॉटेल्स आदींबाबत नियोजन करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी केल्या. तत्पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 

जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन 
नागरिकांनी स्वत:च्या व इतरांच्या आरोग्यासाठी शासन-प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. अनेक नागरिकांना अजूनही याचे गांभीर्य नसून, ते बिनधास्तपणे वावरत आहेत. त्यांच्या हलगर्जीपणामुळे संसर्ग पसरण्यास मदत होते. त्यामुळे नागरिकांनी अनावश्‍यकपणे बाहेर पडू नये. आपल्या घरातच आपण सुरक्षित आहोत, याची जाणीव ठेवावी. अत्यावश्‍यक असेल, तरच मास्क लावूनच बाहेर पडा. कुठेही गर्दी करू नये. सोशल डिस्टन्सिंग ठेवणे ही बाब या विषाणूची मानवी साखळी तोडण्यासाठी अतिशय महत्वाची आहे. त्याचे नागरिकांनी पालन करावे. आपले हात साबणाने किंवा सॅनिटायझरने वारंवार स्वच्छ करावेत. या संकटाच्या काळात सर्व जिल्हावासीयांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी केले आहे. 

-संपादन : चंद्रशेखर महाजन 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT