diwali pahat program will cancel due to corona in yavatmal 
विदर्भ

यंदा दिवाळी पहाटला 'ब्रेक', नेमकी काय आहे शासनाची नियमावली?

चेतन देशमुख

यवतमाळ : करोनाचा प्रादुर्भाव अजून कायम आहे. परिस्थिती नियंत्रणात असली तरी नवीन बाधितांचा आकडा बराच आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकार सर्वच बाबतीत सावध पावले टाकत आहे. यंदा दिवाळीसाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यात दिवाळी पहाट हा कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नये, असे नमूद असून, त्याबाबतचे शासनाचे पत्र येथील जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले आहे.   

राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव व नवरात्रोत्सव यांसह सर्वधर्मीयांचे सण यंदा साधेपणाने साजरे करण्यात आले आहेत. त्यामुळेच दिवाळी सणही तशाच पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन आधीच राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. त्यादृष्टीने पहिल्यांदाच दिवाळीसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यात दिवाळी यंदा साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी यावर्षी फटाके टाळावेत व दिव्यांची आरास करण्यावर भर द्यावा, असे नमूद करण्यात आले आहे. प्रमुख शहरांत कोरोनाचे रुग्ण आजही मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. त्यात कोविड साथ लक्षात घेऊन गेल्या आठ महिन्यांत आलेले सर्वच सणोत्सव साधेपणाने, एकत्रित न जमता साजरे करण्यात आलेले आहेत. 

आता दिवाळी सणही अन्य सणोत्सवांप्रमाणे पूर्ण खबरदारी घेऊन साधेपणाने साजरा करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दिवाळी हा दिव्यांचा उत्सव मानला जातो. मात्र, या उत्सवात दरवर्षी मोठ्या प्रमाणात फटाक्‍यांची आतषबाजी केली जाते. त्यामुळे वायू व ध्वनिप्रदूषणाची पातळी वाढून सर्वांच्याच आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. यास्थितीत कोरोनाबाधित रुग्णांना फटाक्‍यांच्या धुराचा अधिकच त्रास होण्याची भीती आहे. ही बाब विचारात घेऊन नागरिकांनी यंदा फटाके फोडणे टाळावे व त्याऐवजी दिव्यांची आरास मोठ्या प्रमाणावर करून उत्सव साजरा करावा. याशिवाय इतरही मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, त्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाला धडकले असून, जिल्हाधिकाऱ्यांकडूनही यासंदर्भात लवकरच आदेश काढले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT