file photo
file photo 
विदर्भ

पत्नीच्या त्रासाला कंटाळून डॉक्‍टरची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पत्नी व तिच्या दोन नातेवाइकांनी डॉक्‍टर असलेल्या पतीला शारीरिक व मानसिक त्रास दिला. त्यामुळे कंटाळून डॉक्‍टरने गळफास लावून आत्महत्या केली. डॉ. सागर नरेंद्र मोरघडे (32, पायोनियर वूड्‌स सोसायटी, वानाडोंगरी) असे आत्महत्या करणाऱ्या डॉक्‍टरचे नाव आहे. या प्रकरणी पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी डॉक्‍टर पत्नीसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. सागर मोरघडे हे मूळचे सावंगी मेघे (जि. वर्धा) येथील राहणारे होते. ते यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयात बालरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत होते. वैद्यकीय शिक्षण घेताना त्यांच्यासोबतच शिकणाऱ्या राधानगर, नरसाळा येथील तरुणीशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. दोन वर्षांपूर्वी त्यांचे रितिरिवाजाप्रमाणे लग्न झाले. डॉ. सागर मोरघडे हे स्वछंदी स्वभावाचे होते. ते मित्रांसोबत कधी-कधी मद्य प्राशन करीत होते. पती मद्य पीत असल्याने हा प्रकार पत्नी डॉ. कोमलला खटकत होता. त्यावरून त्यांच्यात वाद होत होते. त्यामुळे लग्नानंतर काही दिवसांतच डॉ. कोमल ही सागरला सोडून आपल्या माहेरी निघून गेली. तेव्हापासून डॉ. सागर हे एकटेच राहत होते. त्यातच कोमलच्या माहेरची मंडळी आशीष मुकुंदराव तोडकर (33), मनीषा मुकुंदराव तोडकर (राधानगर, नरसाळा) हे डॉ. सागरच्या वागण्यावर दडपण आणत होते. त्याचप्रमाणे तिघेही मानसिक त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून 26 एप्रिल रोजी सकाळी अकराच्या सुमारास डॉ. सागर यांनी आपल्या घरी सीलिंग पंख्याला ओढणी बांधून गळफास लावला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. तपासांत डॉ. कोमल आणि तिचे नातेवाईक आशीष व मंजूषा हे दोषी आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुरात शतकाच्या उंबरठ्यावर, सीएसके गाठणार का 200 चा टप्पा

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ओडिशातील लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची काँग्रेसकडून यादी जाहीर

SCROLL FOR NEXT