Dr Tanaji Sawant statement Maharashtra Government Master Plan to Eradicate Malnutrition health amravati
Dr Tanaji Sawant statement Maharashtra Government Master Plan to Eradicate Malnutrition health amravati sakal
विदर्भ

Dr. Tanaji Sawant : कुपोषण निर्मूलनासाठी सरकारचा मास्टर प्लॅन; डॉ. तानाजी सावंत

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : मेळघाटच्या माथ्यावरील कुपोषणाचा शिक्का पुसण्यासाठी राज्य शासनाने कंबर कसली असून कुपोषणमुक्तीसाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. येत्या १५ दिवसांत त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागतील, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज (ता.३) येथे केले. दोन दिवसीय मेळघाट दौरा आटोपल्यानंतर त्यांनी शनिवारी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. आरोग्यमंत्री म्हणाले, मेळघाट कुपोषणमुक्त करण्यासाठी एक मॉडेल तयार करण्यात आले असून सहा महिने ते एका वर्षाच्या काळात मेळघाटातील कुपोषणावर नियंत्रण झालेले दिसेल.

मेळघाटातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयांमधील परिस्थिती आपण पाहिली असून मेळघाटात पुरेसा औषधीसाठी उपलब्ध असल्याचे ते म्हणाले.

इर्विनच्या प्रश्नांवर चुप्पी

जिल्हा सामान्य रुग्णालयात पुरेसा औषधसाठा उपलब्ध नसून सीटी स्कॅन, एक्सरे मशिन्स दोषपूर्ण असल्याच्या प्रश्नांवर आरोग्यमंत्र्यांनी उत्तर देण्याचे टाळले. आपण यावेळी केवळ मेळघाटचे व्हीजन ठेवल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Fact Check: पूजेच्या साहित्यावर जीएसटी सूट देण्यास काँग्रेसने विरोध नाही, फेक पोस्ट होताहेत व्हायरल

Deepfake Detector : आता डीपफेक व्हिडिओ ओळखणं झालं सोपं; 'ओपन एआय' कंपनीने लाँच केलं नवीन टूल

Latest Marathi News Live Update : चार धाम यात्रेबाबत मोठी अपडेट; उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणाले..

राज्यातील चार शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर; कधी होणार मतदान?

SCROLL FOR NEXT