File photo
File photo 
विदर्भ

हिवताप विभागात औषधांचा तुटवडा

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : जलजन्य आजारांनी जिल्ह्यात डोके वर काढले आहे. यावर प्रतिबंध करणाऱ्या औषधांचा वापर या काळात होणे गरजेचे आहे. मात्र, हिवताप विभागाकडे औषधीच उपलब्ध नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता हिवताप विभागाने टेमीफॉस्टची जुळवाजुळव सुरू केली आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जलजन्य, हिवताप व डेंगीचे रुग्ण वाढत आहेत. शासकीय रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी असली तरी खासगीत मात्र, या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. यावर प्रतिबंध घालण्यासाठी "टेमीफास्ट' हे महत्त्वाचे आहे. याशिवाय, फॉगिंग करताना प्रायराथ्रॉन, सायफेनोथ्रीम, मेलीथॉनचा वापर महत्त्वाचा आहे. परंतु, या औषधांचा तुटवडाही हिवताप विभागाकडे आहे. जिल्ह्याला जलजन्य आजारांच्या या वेळेत दरवर्षी शंभर लिटर टेमीफॉस्ट दिल्या जायच्या. यंदा शंभर मिलीग्रॅम औषधीही हिवताप विभागाकडे उपलब्ध नाहीत. जिल्ह्यात मच्छराचे प्रमाण वाढत असताना औषधी नसल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. जिल्हा हिवताप कार्यालय जिल्ह्यात जनजागृती करीत आहे. मात्र, त्यांच्याच कार्यालयाजवळ मोठे डबके साचले असून, स्वच्छतेचा अभाव आहे. "दुसऱ्या सांगे ब्रम्हज्ञान स्वत: मात्र कोरड पाषाण', अशी अवस्था आहे. डेंगी झालेल्या रुग्णांच्या घरातील इतर व्यक्तीचे रक्तनमुने घेतले जातात. मात्र, यंदा नमुने घेण्याबाबत चालढकल होत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असतानाही औषधी उपलब्ध नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केली जात आहे. शासकीय आकडेवारीनुसार आठ महिन्यांत डेंगीची 179 रुग्ण आहेत.
शहरात भीती जास्त
शहरातील अनेक भागांत पाणी साचले आहे. या पाण्यात डासांची उत्पत्ती होऊन आचार पसरण्याची भीती अधिक आहे. शहरातील यवतमाळ, लोहारा, भोसा या भागांत हे प्रमाण जास्त असल्याचे हिवताप विभागानेच स्पष्ट केले आहे. त्यामुळे यावर नियत्रंण मिळविताना मोठी कसरत पालिका प्रशासन व हिवताप विभागाला करावी लागणार आहे.

औषधी खरेदी झाली आहे. मात्र, ती तपासणीसाठी गेली आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर औषधांचा पुरवठा होईल. सध्या "डीएमओं'ना औषधी खरेदी करण्यासाठी 50 हजार रुपये खर्च करण्याचे अधिकार दिले आहे.
- डॉ. कमलेश भंडारी,
सहायक संचालक, हिवताप, अकोला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Varsha Gaikwad: अर्ज भरण्यापूर्वीच वर्षा गायकवाड यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर, उमेदवारीला विरोध करत काँग्रेस नेत्यांची बैठक

Latest Marathi News Live Update: वसंत मोरेंचं लोकसभेचं निवडणूक चिन्ह ठरलं!

T20 World Cup 2024: केएल राहुल, सिराजला संधी नाही! वेस्ट इंडिजच्या दिग्गजाने निवडली टीम इंडिया, पाहा कोणाला दिली संधी

Gurucharan Singh Missing Update : 7000 रुपयांचा व्यवहार, लग्नाची तयारी अन् बेपत्ता झाल्याचं कारस्थान ? गुरुचरण यांच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर

Kolhapur Politics: "इथं जिंकवण्यापेक्षा पाडायचे कोणाला हे पहिलं ठरतं"; इतिहास कोल्हापूरच्या राजकारणाचा

SCROLL FOR NEXT