crime
crime 
विदर्भ

एलआयसी ऑफिसमध्ये बनावट नोटा जमा करणे भोवले

सकाळवृत्तसेवा

देऊळगाव राजा : भारतीय जीवन विमा निगमच्या कार्यालयात बनावट नोटा भरल्याप्रकरणी आरोग्य विभागाच्या एका कर्मचार्‍यांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून चार दिवस उलटले तरीही आरोपीस अटक करण्यात आली नाही.

याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, स्थानिक सिव्हिल कॉलनी येथील एलआयसीच्या शाखेमधील शाखा व्यवस्थापक अनिरुद्ध सुरेश घोंगडे हे 14 नोव्हेंबरला दिवसभरातील जमा झालेली रोख रक्कम एक लाख 27 हजार 822  रुपये मोजत होते. यादरम्यान शंभर रुपयाच्या बंडल मधील काही नोटा मोजत असताना काही नोटांचा कागद त्यांना मूळ नोटांच्या कागदापेक्षा वेगळे वाटल्याने त्यांनी निरखून पाहिले असता काही नोटा एकाच नंबरच्या असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सदर प्रकार त्यांनी श्रीकृष्ण पेठ अमरावती येथील डिव्हिजन ऑफिस मधील अधिकार्‍यांच्या लक्षात आणून दिले. दरम्यानच्या काळात सीसीटीव्हीच्या आधारे तपासणी करून पाहिले असता एस. एस. सुतार नावाचा कर्मचार्‍याने शंभर रुपयांच्या नोटांचे बंडल भरल्याचे लक्षात आले. याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आदेशानुसार एलआयसी विभागाचे स्थानिक शाखा व्यवस्थापक अनिरुध्द सुरेश घोंगडे यांनी शनिवारी (ता.17) पोलिसात तक्रार नोंदविली.

आरोपीला अटक नाही
सदर तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एस. एस. सुतार यांच्याविरोधात शंभर रुपयाच्या 53 नोटा असे एकूण 53 हजार रुपयांच्या बनावट नोटा जमा केल्याबद्दल गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत सदर प्रकरणात ठाणेदार सारंग नवलकार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक निता गायकवाड, पोलीस नाईक रवींद्र चव्हाण तपास करीत आहे. सदर प्रकरणात गुन्हा नोंदवून चार दिवस उलटले असून आरोपीस अटक करण्यात आली नाही.

त्या कर्मचार्‍याची पत्नी एलआयसी एजंट
आरोग्य विभागाच्या ज्या कर्मचार्‍याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला त्यांची पत्नी एलआयसी एजंट असून एलआयसी विमा पॉलिसी बद्दल त्यांच्याकडे भरण्यात आलेल्या रकमेचा भरणा करण्यास श्री. सुतार एलआयसीच्या स्थानिक शाखेत गेले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT