दुष्यंत चतुर्वेदी
दुष्यंत चतुर्वेदी  
विदर्भ

सतीश चतुर्वेदी यांचा मुलगा दुष्यंत यांचा शिवसेनेत प्रवेश

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराला ऊत आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयदत्त क्षीरसागर यांच्यानंतर नागपूर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी वस्त्रोद्योग मंत्री सतीश चतुर्वेदी यांचा मुलगा दुष्यंत चतुर्वेदी शिवसेनेच्या वाटेवर आहेत. रविवारी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दुष्यंत यांचा पक्षप्रवेश होणार आहे.
दुष्यंत चतुर्वेदी हे नागपूर विद्यापीठचे सिनेट सदस्य असून, ते नागपूर येथील लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्थेचे विश्‍वस्त आणि संचालकही आहेत. लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्थेची नागपूर आणि मुंबईत मिळून एकूण 28 शाळा-महाविद्यालये असून, यात 2 हजार शिक्षक कार्यरत आहेत. तर 20 हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने याचा शिवसेनेला फायदा होणार आहे.
माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना दोन वर्षांपूर्वीच पक्षविरोधी कारवाईप्रकरणी पक्षातून निष्कासित करण्यात आले आहे. प्रदेश कॉंग्रेसचे पदाधिकारी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांशी पटत नाही. महापालिकेच्या निवडणुकीत तिकीट वाटपावरून प्रचंड असंतोष उफाळून आला होता. माजी खासदार विलास मुत्तेमवार आणि शहराध्यक्ष विकास ठाकरे शहरात यांच्यासह त्यांनी थेट प्रदेशाध्यक्षांवरही उघड नाराजी व्यक्त केली होती. लोकसभेच्या आधी निष्कासन मागे घेतले जाईल, अशी आशा चतुर्वेदी यांना वाटत होती. तशा हालचालीसुद्धा सुरू झाल्या होत्या. मात्र, प्रदेशाध्यक्षांनी प्रतिष्ठेचा मुद्दा केल्याने निर्णय होऊ शकला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

Car Care Tips : ‘या’ चुकांमुळे कमी होऊ शकते इलेक्ट्रिक कारची रेंज, अशी घ्या काळजी

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

SCROLL FOR NEXT