भूकंपाचे धक्के
भूकंपाचे धक्के  sakal media
विदर्भ

गडचिरोलीसह चंद्रपूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील काही गावांमध्ये रविवार (ता. ३१) सायंकाळी ६. ४८ वाजता दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.अहेरी तालुक्यातील आलापल्ली, गुड्डीगुडम, कमलापूर, रेपनपल्ली, जिमलगट्टा, देचलीपेठा, बोरी आदी परिसरात तसेच सिरोंचा व आष्टी परिसरात सायंकाळी अचानक भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी तातडीने माहिती प्रसारित केली आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार नॅशनल सेंटर फाॅर सिस्मॉलॉजीने जीओआय. ७७ किमी खोलीसह ४.३ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याचे म्हटले आहे. अक्षांश १९.०० आणि रेखांश ७९.९६ आहे. हा अहवाल वेळ ६. ४८ आहे. गडचिरोली आणि तेलंगणा सीमेवर जाफराबाद चकजवळ (प्राणहिता नदीजवळ) सिरोंचा तालुका अक्षांश आणि रेखांशानुसार केंद्राची नोंद आहे. मात्र, अद्याप अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. कोणतीही दहशत आणि भीती निर्माण करणारे संदेश पसरवू नयेत. आत्तापर्यंत कोणतीही मानवी किंवा मालाची हानी झाल्याचे वृत्त नाही. संबंधित विभागांकडून माहिती प्राप्त होताच अधिकृत अहवाल दिला जाईल, असेही जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी कळविले आहे.

गोंडपिपरीत सौम्य धक्के; दरूर मध्ये घरातील भांडे पडले.

सायंकाळी पाउनेसात वाजताच्या सुमारास गोंडपिपरी तालुक्यातील काही गावात सौम्य धक्के जाणवले. तर दरूर गावासह परिसरात काहींच्या घरातील भांडे खाली पडले.आज गडचिरोली जिल्ह्यात भुकंपाचे धक्के बसल्याने गोडपिपरी तालुक्यातील हे धक्के भुकंपाचे तर नसावे असा कयास नागरिकाःनी काढला, गोंडपिपरी शहरात सेंकदभरासाठी घर हालल्याचे अनेकांनी सांगीतले. एकंदरीत आज घडलेल्या प्रकाराने हे धक्के नेमके कशाचे याबाबत चर्चा सूरू आहे. दरम्यान यासंदर्भात तहसीलदार के.डि.मेश्राम यांच्यांशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती घेण्याचे काम सूरू असल्याचे सांगितले.

"गडचिरोली आणि तेलंगणा सीमेवर जाफ्राबाद चकजवळ (प्राणहिता नदीजवळ), सिरोंचा तालुका-अक्षांश आणि रेखांशानुसार केंद्राची नोंद आहे. अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. कृपया कोणतीही दहशत आणि भीती निर्माण करणारे संदेश पसरवू नयेत. आत्तापर्यंत कोणतीही मानवी किंवा मालाची हानी झाल्याचे वृत्त नाही. संबंधित विभागांकडून माहिती प्राप्त होताच अधिकृत अहवाल दिला जाईल."

- संजय मीणा, जिल्हाधिकारी, गडचिरोली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT