विदर्भ

खाद्य तेलात भेसळ

सकाळ वृत्तसेवा

कामठी : नामांकित कंपनीच्या तेलाच्या रिकाम्या डब्यातून निकृष्ट दर्जाच्या खाद्य तेलाची विक्री करणाऱ्या दोन आरोपींना गुरुवारी रात्री जुनी कामठी पोलिसांनी अटक केली आहे. दिवाळीत खाद्य तेलाची मागणी वाढत असल्याने केवळ नफा कमविण्यासाठी नागरिकांच्या आरोग्याशी दोन्ही आरोपी खेळ करीत होते. ही कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आली. 
फॉर्च्यून सोयाबीन तेलाच्या सॅम्पलवर बनावटी तेल विक्री होत असल्याची तक्रार कंपनीच्या विक्री अधिकारी दिलीपकुमार स्वर्णकार यांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती कामठी पोलिसांना दिली. कंपनीच्या अधिकाऱ्यांसह जुनी ओली कामठी येथील कैलास ट्रेडर्स व ओम किराणा स्टोअर्समध्ये धाड घातली. पोलिसानी जुनी ओलीतील दुकानात धाड घालून 20 लिटरप्रमाणे 22 बनावटी फॉर्च्यून तेलाचे डबे (किमत 42 हजार 900) व 20 लिटरचे त्याच कंपनीचे रिकामे 15 डबे (किमत 450) व 90 लिटरचे खुल्या तेलाचे दोन ड्रम (किंमत 18 हजार) असा एकूण 61 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी महेश दौलतराम कृष्णानी (वय 49) व राकेश किशोर कृष्णानी (वय 32, दोघेही रा. जुनी ओली, कामठी) यांना अटक केली असून त्यांच्यावर विविध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. 
खाद्य तेल महाग असले तरीही नामवंत व दर्जेदार रिफाइंड तेलाच्या वापरावर नागरिकांचा भर असतो. याचाच फायदा घेत कामठी येथील काही दुकानात फॉर्च्यून या नामांकित तेल कंपनीच्या रिकाम्या डब्यात निकृष्ट दर्जाचे व बनावट तेल विकत असल्याचे यावरून सिद्ध झाले आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवीदास कठाळे यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT