विदर्भ

निवडणुकीत पैशाचे व्यवहार रडारवर

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विधानसभा निवडणुकीत काळ्या पैशाचा होणारा संभाव्य वारेमाप वापर रोखण्यासाठी निवडणूक आयोग प्राप्तिकर विभागाची मदत घेणार आहे. विमानतळ, रेल्वेस्थानक, हॉटेल्स, फार्म हाउसवर 24 तास करडी नजर ठेवण्यासोबतच काळ्या पैशांच्या व्यवहाराबाबत प्राप्तिकर विभागास माहिती देण्यासाठी आता टोल हेल्पलाइनही सुरू केली. प्रथमच सहकारी बॅंकेच्या व्यवहारावर करडी नजर ठेवण्यात येईल, अशी माहिती प्रधान प्राप्तिकर आयुक्त (अन्वेषण) जयराज काजरा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
निवडणूक अटीतटीची होण्याची शक्‍यता असल्याने काळ्या पैशाचा वापरही वारेमाप होण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगानेही यंत्रणा सज्ज केली आहे. काळा पैसा शोधण्यासाठी आयोगाच्या आदेशानुसार प्राप्तिकर विभागाने यंत्रणा कामाला लावली आहे. निवडणुकीत होणाऱ्या व्यवहारांवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी विभागाने प्राप्तिकर विभागाचे अप्पर संचालक, विभागीय अधिकारी आणि व्हेरिफिकेशन अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली त्रिस्तरीय यंत्रणा कार्यान्वित केली. त्यासाठी 12 पथक तयार केले असून, त्यात 70 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यातील दोन पथक विमानतळावर तैनात राहतील. 50 हजारांपेक्षा अधिक रोख रक्कम बाळगताना त्याची माहिती जवळ असणे बंधनकारक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Storage: भारतात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा किती दिवसांचा साठा शिल्लक आहे? केंद्र सरकारने आकडा सांगून विषयच संपवला!

Vaibhav Suryavanshi उद्यापासून टीम इंडियाच्या सीनियर संघासाठी पात्र ठरणार; IPL 2026 नंतर कोहली, रोहितसोबत खेळणार...

Kondhwa News : बोपदेव घाट उतारावर सातत्याने अपघात; प्रशासनाने गतिरोधक बसवण्याची नागरिकांची मागणी

farmer relief fund : विमा नसलेल्या बागांना हेक्टरी २२ हजारांची मदत; नुकसानग्रस्त बागायतदारांना शासनाकडून दिलासा

Electricity Bill Hike: सर्वसामान्यांना मोठा धक्का! वीज दरात वाढ करण्यास मंजुरी; आता प्रति युनिट किती रुपये मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT