Mission-Admission
Mission-Admission 
विदर्भ

दोन दिवसांत ३९० विद्यार्थ्यांची नोंदणी

सकाळवृत्तसेवा

नागपूर - अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशात कला, वाणिज्य, विज्ञान आणि एमसीव्हीसीसाठी प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार शुक्रवारीपासून (ता.२७)  विद्यार्थ्यांना नव्याने अर्जाचा पहिला व दुसरा टप्पा भरण्याची देण्यात आली. मात्र, यात केवळ ३९० विद्यार्थ्यांनीच त्या संधीचा फायदा घेतला. त्यामुळे आता एकूण अर्ज संख्या ३६ हजार ६११ वर गेली आहे. आतापर्यंत चार शाखा आणि द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या एकूण २५ हजार ४३६ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदविले आहेत. 

शहरात मे महिन्यापासूनच अकरावी प्रवेशासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली. चारही शाखांतील ५४ हजार २३० जागांसाठी ३५ हजार ८६२ अर्ज आलेत. ५ जुलैला या  शाखांमधील प्रवेशाची यादी महाविद्यालयांना पाठविण्यात आली. यात १९ हजार २५१  विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यापैकी १६ हजार ९९३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. प्रवेश प्रक्रियेस दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. यानंतर दुसऱ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांनी ऑप्शन नोंदविले. दुसऱ्या फेरीतील १५ हजार ८५० विद्यार्थ्यांची यादी महाविद्यालयांना पाठविण्यात आली. त्यापैकी ५ हजार ३३० विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदविला. शुक्रवारपासून (ता. २६) दोन दिवस विद्यार्थ्यांनी  १० हजार ५११ जागांसाठी ऑप्शन नोंदविले. 

२७ आणि २८ जुलैदरम्यान नव्याने नोंदणी करण्याची मुभा देण्यात आली. मात्र, त्यात ३९० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून मंगळवारी (ता. ३१) या प्रवेशाची यादी प्रकाशित करण्यात येणार आहे. याच दिवसांपासून २ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश नोंदविता येईल. तीन ऑगस्टला तिसऱ्या फेरीतील रिक्त जागांची यादी प्रकाशित होईल. ३ आणि ४ ऑगस्टला ज्यांनी आपले अर्जातील ऑप्शनमध्ये बदल केला. त्यांना अर्जाचा पहिला आणि दुसरा भाग भरता येईल.

एकूण जागा - ५४,२३०
अर्ज संख्या - ३६,६११, 
एकूण प्रवेश - २५,४३६
रिक्त जागा - २८,६९४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Labour Day : 1 मे ला कामगार दिवस का म्हटले जाते? काय आहे यामागचा इतिहास? वाचा सविस्तर

रोहित शर्मा-विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-२० ला ठोकणार रामराम, 2024 चे वर्ल्डकप शेवटचे- रिपोर्ट

शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी! पीक कर्जाच्या पुनर्गठनासाठी ऑगस्टपर्यंत मुदत; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सवलत, पण शेतकऱ्यांची संमती पुनर्गठन आवश्यक

Maharashtra Day 2024: महाराष्ट्र दिनानिमित्त द्या खास अंदाजात मराठमोळ्या शुभेच्छा

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT