file photo
file photo 
विदर्भ

अभियांत्रिकीच्या पेपरफूटप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाअंतर्गत झालेल्या अभियांत्रिकी प्रथम वर्षाच्या (मॅकेनिक) विषयाच्या पेपरफूटप्रकरणी शनिवारी (ता. आठ) येथील फ्रेजरपुरा पोलिसांनी दोघांविरुद्ध विद्यापीठ कायदा 1982 च्या कलम 4,5 अन्वये गुन्हा दाखल केला. ज्ञानेश्वर प्रभू बोरे व आशीष एस. राऊत, अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.
ज्ञानेश्‍वर बोरे हे संमती अभियांत्रिकी महाविद्यालय उपरी (जि. वाशीम) येथे लिपीक म्हणून तर आशीष राऊत हा अमरावती विद्यापीठात रोजंदारी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हेमंत देशमुख यांनी शनिवारी (ता.आठ) फ्रेजरपुरा पोलिसांत तक्रार नोंदवली. 27 मे 2019 रोजी अमरावती येथील प्रा. राम मेघे इंजिनिअरिंग कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थ्याचे मोबाईलवर या विषयाचा पेपर (प्रश्‍नपत्रिका) आढळला होता. त्यावेळी ही प्रश्‍नपत्रिका कुठून लीक झाली, याची माहिती पुढे आली होती. त्यावर कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या आदेशान्वये एका चौकशी समितीचे गठन करण्यात आले होते. त्या चौकशी समितीने आपला अहवाल नुकताच सादर केला. वरिष्ठांच्या आदेशान्वये डॉ. हेमंत देशमुख यांनी शनिवारी (ता. आठ) फ्रेजरपुरा पोलिसांत तक्रार नोंदवली.

याप्रकरणाची सखोल चौकशी केल्या जाईल. पेपर फूटप्रकरणातील रॅकेट मोठे असल्याची शक्‍यता आहे. चौकशीअंती याप्रकरणात सहभागी आरोपींची संख्या वाढू शकते.
-राजू लेवटकर, पोलिस उपनिरीक्षक, फ्रेजरपुरा ठाणे, अमरावती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: अस्वस्थ आत्म्यापासून सुटका करुन घ्या म्हणणाऱ्या PM मोदींना शरद पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, हे खरं आहे पण...

Latest Marathi News Live Update : काँग्रेस जनतेची संपत्ती, त्यांच्या व्होटबँकेला वाटणार, मोदींचा आरोप

PM Modi in Dharashiv: अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जेवणाच्या टेबलवर होतं 'सूपरफूड'; मोदींनी सांगितला किस्सा

T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

Indian Navy: "कोणत्याही आव्हानासाठी नौदल कायम सज्ज," पदभार स्वीकारताच नवे नौदल प्रमुख गरजले

SCROLL FOR NEXT