file photo
file photo 
विदर्भ

नक्षलवाद्यांकडून नवीन झोनची स्थापना

सुरेश नगराळे

गडचिरोली : गेले काही दिवस थंडावलेली नक्षल चळवळ पुन्हा सक्रिय करण्यासाठी नक्षल नेते नंबाला केशव, मिलिंद तेलतुमडे व भूपती यांच्या नेतृत्वात तीन राज्ये मिळून नवीन झोनची नुकतीच स्थापना करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यामध्ये महाराष्ट्र, छत्तीसगड व मध्य प्रदेशचा समावेश आहे.
छत्तीसगडमध्ये सक्रिय असलेल्या नक्षलवादी संघटनेने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात आपले अस्तीत निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी स्थापन केलेल्या नवीन झोनच्या दलममध्ये युवकांच्या भरतीवर भर दिला जाणार आहे. बालाघाट परिसरातील जंगलात झालेल्या एका बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. नवीन झोनमधील प्रत्येक राज्याची जबाबदारी लवकरच
सोपविली जाणार असून त्यासाठी केंद्रीय समितीच्या काही सदस्यांच्या नावांचा विचार सुरू आहे.
केंद्रीय समितीचा सदस्य मिलिंद तेलतुमडे याचा सध्या बालाघाट परिसरात वावर असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती आहे. जास्त धावपळीची कामे करता येत नसल्याने सुरक्षित ठिकाणावरून तो नक्षल चळवळीचे काम पाहत आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील कसनासूर गावालगत गेल्यावर्षी झालेल्या चकमकीत 40 नक्षलवादी ठार झाले होते. यात काही दलम कमांडरचाही समावेश होता. या घटनेनंतर गेले काही दिवस नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांमध्ये कमी आली होती. मात्र, पोलिस दलाचा बदला घेण्यासाठी नक्षलवादी नेत्यांची रणनीती सुरू होती; परंतु छत्तीसगड व महाराष्ट्र पोलिसांकडून सतत कोम्बिंग ऑपरेशन सुरू होते. त्यामुळे नक्षलवाद्यांचे मनसूबे पूर्ण झाले नाही. त्यानंतर केंद्रीय समितीने उत्तर भागात मोठी घटना घडवून आणण्याचा कट रचला. कुरखेडा तालुक्‍यातील जांभूळखेडा
गावालगत भूसुरुंग स्फोट घडवून आणण्यात ते यशस्वी झाले. या घटनेत 15 पोलिस जवान शहीद झाले होते.
भास्करकडे नवीन झोनची जबाबदारी
तब्बल पाच ठिकाणी भूसुरुंग लावून पोलिस जवानांना जाळ्यात अडकविण्यासाठी भास्करने सारी ताकद लावली होती. यासाठी तीनशेवर सदस्यांना एकत्र आणून काम फत्ते केले. केंद्रीय समितीने त्याच्या कामाची दखल घेतली असून भास्करकडे लवकरच नवीन झोनमधील एका राज्याची जबाबदारी सोपविली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरू चेन्नई प्लेऑफच्या एका जागेसाठी भिडणार, पण पावसाचे अंदाज काय?

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींनी रायबरेली, अमेठीत प्रचार करणे टाळले, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT