file photo
file photo 
विदर्भ

चंद्रपूर वीज केंद्रात स्फोट; तीन जखमी

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : येथील वीज केंद्रातील संच क्रमांक आठ आणि नऊमध्ये एक्‍सिलेटरचे काम करताना अचानक स्फोट झाला. यात तीन कामगार जखमी झाले. स्फोट तीव्र नसला तरी यात कामगारांना मोठी इजा झाली आहे. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चंद्रपूर वीज केंद्रातील आठ आणि नऊ संच अडीच वर्षांपूर्वी कार्यान्वित झाले. याच संचामध्ये रात्रपाळीत काम करीत असताना सुमारे साडेनऊच्या सुमारास एक्‍सिलेटर चालू-बंद करताना अचानक स्फोट झाला. यावेळी तिथे काम करणारे श्रीराम ढोरे, राहुल लोणारे आणि प्रवीण नावाचे कामगार भाजले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती आटोक्‍यात आणली. जखमींना डॉ. पालीवाल रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती ठीक आहे. स्फोटाची चौकशी केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Latest Marathi News Live Update : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांनी कसली कंबर

SCROLL FOR NEXT