fake man did fraud with farmer in chandrapur  
विदर्भ

"तुमच्या घरी गुप्तधन आहे" असं म्हणत भोंदूबाबानं केली शेतकऱ्याची तब्बल दोन लाखांनी फसवणूक 

सकाळ डिजिटल टीम

सावली (जि. चंद्रपूर)  : साधूच्या वेशात दोघांनी एका शेतकऱ्याच्या घरी प्रवेश केला. महाशिवरात्रीला साधू आल्याने बघून आदरातिथ्य केले. शेतकऱ्याचा भोळा स्वभाव बघून साधूंनी घरात गुप्तधन असून, आजच्या शुभदिनी खोदकाम करणे गरजेचे असल्याचे सांगितले. शेतकऱ्यानेही लालसेपोटी त्यांच्या जाळ्यात अडकून होकार दिला. अग्रीम म्हणून दहा हजार रुपये साधूंनी दिले. 

खोदकाम करताना हातातील सोन्याची अंगठी टाकून शेतकऱ्याला गुप्तधन मिळाल्याचे सांगितले. शेतकऱ्याचा विश्‍वास बसला. त्यामुळे या साधूंनी उर्वरित दोन लाखाची रक्कम वैनगंगा नदीच्या तीरावर देण्यासाठी बोलाविले. शेतकऱ्याने पैसे दिले. यानंतर साधूंनी तेथून पळ काढला. ही घटना तालुक्‍यातील बोथली येथे घडली. विठ्ठल झिंगुजी शिंदे (वय 55) असे फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

महाशिवरात्रीच्या दिवशी साधूच्या वेशातील दोघे तालुक्‍यातील बोथली गावात गेले. बोथली-हिरापूर मार्गावरील शिंदे या शेतकऱ्याचे घर गाठले. महाशिवरात्रीला साधू घरी आल्याने शूभघडी असल्याचे समजून आदरातिथ्य केले. त्यानंतर दोन्ही साधूंनी शेतकऱ्याला आपल्या जाळ्यात ओढणे सुरू केले. घरी गुप्तधन असून, ते आजच खोदकाम करणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यासाठी दहा हजार रुपये अग्रीम द्यावे लागतील. 

उर्वरित काम झाल्यानंतर असे ठरले. शेतकरीही लालसेपोटी त्यांच्या जाळ्यात अडकला. घरात खोदकामाला सुरुवात झाली. यावेळी एका साधूने हातातील अंगठी खोदकामात टाकून तीच शेतकऱ्याला गुप्तधन म्हणून दिली.

या प्रकाराने शेतकऱ्याचा विश्‍वास संपादन केला. पुढील कामासाठी ज्ञानी पंडितांना बोलवावे लागेल म्हणून उर्वरित रक्कम वैनगंगा नदीच्या तीरावर आणून देण्यास सांगितले गेले. गुप्तधनाच्या लालसेपोटी शेतकऱ्याने दोन लाख आठ हजार रुपये वैनगंगा नदीच्या तीरावर या दोन साधूंनी दिले. साधूंनी ही रक्कम घेऊन पळ काढला. काही दिवसानंतर शेतकऱ्याने साधुनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. मात्र, फोन नॉटरिचेबल होते. यानंतर आपली दोन लाख 18 हजार रुपयांनी फसवणूक झाल्याचे शेतकऱ्याच्या लक्षात आले. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: KL Rahul ने झेल सोडला! शुभमन गिल अम्पायरसोबत भांडला; Umpire ने मागे ढकलले अन् म्हणाले, जा...

Valhe News : बँकेबाहेर विसरलेली सव्वा लाखाची रोकड असलेली पिशवी दांपत्यास केली परत

Video: बापरे! प्रार्थना बेहरेच्या पायाला गंभीर दुखापत, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'तुमच्या आशिर्वादाची...'

Viral Video: हत्तीच्या बाळाची टरबूज मागण्याची क्यूट अदा, हृदयस्पर्शी व्हिडिओने जिंकली नेटकऱ्यांची मने

Thane Crime: कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ, धक्कादायक आकडेवारी समोर

SCROLL FOR NEXT