electric shock sakal
विदर्भ

बंद वीज पुरवठा सुरू झाला अन् शेतकऱ्याचा बळी गेला

गोंडपिपरी तालुक्यातील सकमुर येथील घटना

संदीप रायपुरे

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) - शेतातुन गेलेले पोल वाकल्याने विद्यूत तारा जमीनीवर आल्या. शेतकऱ्याने तीन महिन्यापुर्वी याप्रकाराची महावितरणकडे तक्रार दिली. नंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तेथील विद्यूत पुरवठा खंडीत केला. जमिनीवर विद्युत तार असले तरी त्यात प्रवाह नसल्याची माहिती शेतकऱ्यांना होती. दरम्यान शेतात आलेला बैल हाकलण्यास गेलेल्या शेतकर्यांचा याच ताराच्या विद्यूत प्रवाहाने मृत्यू झाला. आज दुपारी तीन वाजता हा प्रकार समोर आला.अन गावकर्यांनी आक्रमक भुमीका घेत महावितरण विरोधात संताप व्यक्त केला.

राजेश्वर तोहोगावकर (वय 59) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. ते गोंडपिपरी तालुक्यातील सकमुर येथील रहिवाशी होते. आज दूपारी घटनेची माहिती कळताच सकमुरवासीय एकत्र आले. विद्यूत प्रवाह बंद असतांना तो सुरू कसा झाला. वारवांर तक्रार देऊनही महावितरणने निष्काळजीपणा केला त्यामुळ एका गरीब शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची भावना व्यक्त करित तातडीन मृतकांच्या कुटुंबियांना मदत करा अन्यथा मृतदेह उचलू देणार नाही आसा इशारा दिला.घटनेची गंभीरता लक्षात घेता धाबा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुशील धोकटे घटनास्थळी दाखल झाले.

विद्यूत पोल सरळ करण्यासाठी तोहोगावकर यांनी महावितरण कडे तक्रार दिली होती.वारंवार पाठपुरावा केला. पण त्यांच्या मागणीकडे लक्ष दिल्या गेले नाही. शेतात पसरलेल्या तारात विद्यूत प्रवाह नसतांना तो कधी सूरू केला. या प्रकरणास महावितरण जबाबदार आहे.कुटुंबियांना मदत व दोषीवर तातडीन कार्यवाही करावी.

- अशोक रेचनकर, माजी उपसभापती, बाजार समिती, गोंडपिपरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : राज्यात विजांसह पावसाची शक्यता; पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज

Parag Shah: ३३८३ कोटींचे आमदार रस्त्यावर उतरले; भिक्षेकऱ्याचा वेश करून मागितली भिक्षा, नेमकं कारण काय?

IMD Weather Update: मॉन्सून शनिवारपासून परतीच्या मार्गावर : ‘आयएमडी’ पश्चिम राजस्थानातून घेणार माघार

Maharashtra Police Recruitment: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! राज्यात ८१०० पदांसाठी नववर्षात भरती; सोलापुरात ११७ जागा

जीवनमान-जीवनभान : व्यायामाने जपूया मानसिक आरोग्य

SCROLL FOR NEXT