file photo
file photo 
विदर्भ

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

सकाळ वृत्तसेवा

सिंदेवाही (जि. चंद्रपूर) ः शेतातील काम आटोपून घराकडे येत असलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना शुक्रवारी (ता. 14) सायंकाळच्या सुमारास गुंजेवाही येथे घडली. मृताचे नाव अशोक जंगलू चौधरी (वय 57) आहे. जंगलाला लागूनच गुंजेवाही गाव आहे. गावालगत अशोक चौधरी यांचे शेत आहे. सध्या खरिपाचा हंगाम आहे. त्यामुळे शेतीच्या कामासाठी अशोक चौधरी शुक्रवारी शेतावर गेले होते. काम आटोपल्यानंतर घराकडे येण्यास निघाले असता रस्त्यात वाघाने हल्ला करून त्यांना ठार केले. बराच वेळ होऊनही ते घरी न परतल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. चिकमारा मार्गावर त्यांचा मृतदेह आढळून आला. यापूर्वी याच तालुक्‍यात वाघाने तिघांना ठार केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 मे 2024

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT