कुही ः शेतकऱ्यांचे समाधान करताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार.
कुही ः शेतकऱ्यांचे समाधान करताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार.  
विदर्भ

सत्तेपेक्षा शेतकरी महत्त्वाचा; पवारांचा शेतक-यांचा दिलासा

सकाळ वृत्तसेवा


कुही (जि.नागपूर) ः कुठल्याही सत्तेपेक्षा मला माझा शेतकरी महत्त्वाचा असल्याचे तालुक्‍यातील तितूर येथील धानपिकाच्या नुकसानाची पाहणी करताना प्रसारमाध्यमांनी सत्तास्थापनेबाबत विचारले असता सांगितले.

 
सध्याची राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता शरद पवार एकंदर घडामोडीत "किंगमेकर' ठरताना दिसत आहेत. राज्यातल्या प्रत्येकाच्या तोंडात, कोन बनेगा मुख्यमंत्री, हाच एकच औत्सुक्‍याचा प्रश्न आहे. यात पवारांची अत्यत महत्त्वाची भूमिका आहे, असे असताना शरद पवार मुंबई सोडून विदर्भाचा नुकसान पाहणीदौरा करीत असताना राजकीय पटलावर नवनवीन तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. मात्र, पवारांनी कुही तालुक्‍यातील तितूर येथे नीलकंठ शहाणे यांच्या बांधावर प्रसारमाध्यमांसमोर बोलताना स्पष्ट केले की, मला सत्तेपेक्षा माझा शेतकरी जगला पाहिजे, हे महत्त्वाचे आहे, हे स्पष्ट करून पवारांनी "जाणता राजा'ची प्रचिती दिली. 
तितूर येथील पंचनामे कधी व कसे केले, हे माहीतच नाही. आम्हाला नुकसानभरपाई मिळेल की नाही? साहेब, आपण लवकर सरकार स्थापन करा व आमचा सातबारा कोरा करा, तुम्हीच यापूर्वी 72 हजार कोटींची कर्जमाफी केली होती. तुमच्याशिवाय कुणीही ते करू शकत नाही, अशी विनंती सर्व उपस्थित शेतकऱ्यांनी एकमुखाने केली. त्यावर पवार म्हणाले, मला तुमच्या वेदना कळतात. मी या वेदना राज्यसरकारपर्यंत नक्कीच पोहोचवणार. त्यावर राज्यसरकारची निश्‍चित सकारात्मक भूमिका असेल, असा दिलासा पवार यांनी दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. 
यावेळी शरद पवार यांच्यासोबत माजी मंत्री व आमदार अनिल देशमुख, माजी मंत्री रमेशचंद्र बंग, माजी मंत्री राजेंद्र मुळक, आमदार प्रकाश गजभिये, आमदार राजू पारवे, माजी आमदार आशीष देशमुख, जिल्हाध्यक्ष बाबा गुजर, महिला जिल्हाध्यक्ष अर्चना हरडे, कार्याध्यक्ष राजू राऊत, सेवादलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक राऊत, संजय गांधी योजनेचे माजी अध्यक्ष लीलाधर धनविजय, तालुकाध्यक्ष सुरेश कुकडे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 
माजी मंत्री देशमुखांकडून सारथ्य 

कुही शहरातून पवार जात असताना त्यांची गाडी खुद्द राज्याचे माजी शिक्षण तसेच अबकारी मंत्री व विद्यमान आमदार अनिल देशमुख हे चालवित होते. याचे सर्वांना कुतूहल वाटत होतेच. सोबतच पवारांना वाटणारा विश्वासही प्रतीत होताना दिसत होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: दमदार सुरुवातीनंतर कोलकाताने गमावली पहिली विकेट; नवीन-उल-हकने आक्रमक खेळणाऱ्या ओपनरला धाडलं माघारी

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT