galfas.jpg 
विदर्भ

कर्जमाफीच्या यादीत नव्हते नाव म्हणून शेतकऱ्याने केले तेच...

सकाळ वृत्तसेवा

देऊळगाव राजा (जि.बुलडाणा) : कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्याने निराश झालेल्या वृद्ध शेतकऱ्याने पाण्याच्या टाकीला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता.18) सकाळी अंढेरा पोलिस ठाणे हद्दीत घडली.

दोन एकर शेतीवर बँकेसह खासगी कर्ज
याबाबत अंढेरा पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, चिखली तालुक्यातील पिंपळवाडी शिवारात आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास एका वृद्ध शेतकऱ्याचा मृतदेह पाण्याच्या टाकीला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. हा वृद्ध शेतकरी उत्तम रोडू सपकाळ (वय 70) रा. पिंपळवाडी, ता.चिखली येथील असल्याचे उघडकीस आले. मृतक शेतकरी अल्पभूधारक असून, त्यांच्या दोन एकर शेतीवर बँकेसह खासगी कर्ज होते. दरम्यान, कर्जमाफीच्या यादीत नाव आले नाही म्हणून ते वैफल्यग्रस्त झाले होते. मृतक शेतकऱ्याचा पुतण्या सुरेश लक्ष्मण सपकाळ रा. पिंपळवाडी यांच्या फिर्यादीवरून अंढेरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhavwadi Kolhapur Railway Project : वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा ‘डीपीआर’ तयार : रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांची माहिती

Pune News: गॅस पाइपलाइनसाठी केंद्राची नवी नियमावली; परवानगी प्रक्रियेतील अडथळे दूर, घरगुती पीएनजी वापराला मिळणार गती

Pune News: हवेलीतील ४६ अधिकारी दोषी! पुण्यातील जमीन मोजणी गैरव्यवहार प्रकरण, कर्मचाऱ्यांची पदोन्नती थांबविण्यात येणार..

IPL 2026 Marathi News: हर्षित राणाच्या जागी KKR च्या ताफ्यात भारताचा स्पीडस्टार... गुजरात टायटन्सनेही खेळाडू बदलला

IPL 2026 मध्ये 'इम्पॅक्ट खेळाडू' चा नियम राहणार की नाही? रोहित, विराट, अक्षर यांच्या विरोधानंतर BCCI अ‍ॅक्शन मोडवर; बैठकीत बरंच काही घडलं

SCROLL FOR NEXT