file photo
file photo 
विदर्भ

येरला येथील शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

मोर्शी (जि. अमरावती) : तालुक्‍यातील येरला शेतशिवारात संतोष जीवनलाल आरोडे (वय 35) या तरुण शेतकऱ्याने अमरावती-नरखेडरेल्वे लाइनवर शनिवारी (ता. 12) सकाळी आत्महत्या केली. सततच्या नापिकीने त्रस्त झाल्याने त्याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे.
आरोडे याने गेल्या काही दिवसांपूर्वीदेखील विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे समजते. परंतु त्यात तो अयशस्वी झाला. त्याला जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे दाखल करण्यात आले होते. 11 ऑक्‍टोबरला दुपारी त्याला दवाखान्यातून सुटी मिळाली. घरी आल्यानंतर रात्रीच्या सुमारास तो घरून निघून गेला. येरला शिवारातील एका शेतातील विहिरीमध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण त्यातही तो अयशस्वी झाल्याने येरला शिवाराला लागून असलेल्या नरखेड-अमरावती लोहमार्गावरील पहाटे साडेतीन ते चारच्या दरम्यान येणाऱ्या मालगाडीखाली त्याने स्वतःला झोकून देत आत्महत्या केली. सततच्या नापिकीने झालेल्या कर्जबाजारीपणाला कंटाळून संतोषने आत्महत्या केल्याची परिसरात चर्चा आहे. मृताच्या मागे वयोवृद्ध आई, बहीण, पत्नी व दोन लहान मुले असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. सर्व परिवाराच्या पालनपोषणाची जबाबदारी संतोषच्या खांद्यावर होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT