farming 
विदर्भ

ते वळले शाश्‍वत शेतीकडे अन्‌ केला स्वतःचा विकास.... 

सकाळ वृत्तसेवा

वर्धा : पारंपरिक शेतीतून होत नसलेल्या उत्पन्नामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी शाश्‍वत शेतीकडे वळले आहेत. शेतीच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी येथील कमलनयन बजाज फाउंडशेनच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमात जिल्ह्यातील एकूण सात हजार 60 शेतकरी सहभागी झाले आहेत. या शेतकऱ्यांना संस्थेकडून आर्थिक सहकार्यही मिळत आहे. 

कमलनयन जमनालाल बजाज फाउंडेशनच्या वतीने शाश्‍वत कृषी विकास कार्यक्रमांतर्गत प्रामुख्याने नैसर्गिक शेती आणि वाडी कार्यक्रमात जिल्ह्यातील शेकडो शेतकरी सहभागी होतात. जिल्ह्यात वाडी कार्यक्रम नाबार्डच्या सहयोगाने राबविला जातो. या कार्यक्रमाद्वारे आदिवासी शेतकऱ्यांना शाश्‍वत उत्पन्नाचे साधन उपलब्ध करण्याचा उद्देश आहे. त्यामुळे त्यांची रोजगारासाठीची भटकंती थांबली आहे. यातून अनेकांनी समृद्धीचा मार्ग शोधला आहे. सध्या या संस्थेकडून फळबागेत आंतरपीक म्हणून भाज्या घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येते. फळे व भाजी विक्रीतून शेतकऱ्यांचे प्रती एकरामागे उत्पन्न वाढले आहे. अनेक शेतकऱ्यांनी या उपक्रमात सहभाग घेत आहे. वर्ध्यात या उपक्रमात जिल्ह्यातील 7 हजार 60 शेतकरी समाविष्ट झाले आहेत. यातील अनेक शेतकरी आता भाजी उत्पादक झाल्याने त्यांना बारमाही मिळकतीची सोय झाली आहे. 

ओलितासाठी आर्थिक मदत 

या उपक्रमात सहभागी होणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांना बजाज फाउंडेशनच्या वतीने ओलित करण्याकरिता आर्थिक मदत देण्यात येत आहे. या मदतीतून अनेक कोरडवाहू शेतकरी ओलिताचे बागायतदार झाले आहेत. त्यांच्याकडून या आर्थिक पाठबळाचा लाभ घेत मोठ्या प्रमाणात भाजीपाला आणि फळबागांची लागवड होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: एससी-एसटी कायद्यातील तरतुदींना आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली; नेमकं प्रकरण काय?

Vishakha Raut: विशाखा राऊतांना दिलासा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; प्रिया सरवणकरांच्या नियुक्तीला ब्रेक

IND vs JPN, Video: पहिलाच बॉल अन् अभिषेक शर्माची जपानच्या १७ वर्षांच्या पोरानं घेतली विकेट; नकोसे विक्रमही झाले नावावर

काटोल नगराध्यक्षांचे पद धोक्यात; अर्चना देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

Marathi News Live Updates : दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी आमदार शेतक-याच्या बांधावर

SCROLL FOR NEXT