Sangit Ingale Sakal
विदर्भ

दारू पिऊन त्रास देणार्‍या बापाचा मुलाने गेला गेम

तालुक्यातील वरवट बकाल येथील संगीत इंगळे या व्यक्तीचा मृत्यूदेह संग्रामपूर ते वरवट मार्गावर मधुकर बकाल यांच्या शेताजवळ पहाटे तामगाव पोलिस हे गस्तीवर असता आढळून आला होता.

सकाळ वृत्तसेवा

संग्रामपूर - तालुक्यातील वरवट बकाल येथील संगीत इंगळे या व्यक्तीचा मृत्यूदेह संग्रामपूर ते वरवट मार्गावर मधुकर बकाल यांच्या शेताजवळ पहाटे तामगाव पोलिस हे गस्तीवर असता आढळून आला होता. सदर मृतदेहाचा पंचनामा करून ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी दिवसभर चौकशी केली असता दारू पिऊन कुटुंबाला त्रास देणार्‍या वडिलांचा मुलाने साथीदारासोबत तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याचे समोर आले आहे.

वरवट येथील व्यक्तीचा मृतदेह हा वरवट ते संग्रामपूर मार्गावर आढळून आल्याने पहाटे या घटनेची माहिती सर्वत्र पसरली होती. तत्काळ या घटनेचा तपास चक्र फिरवले असता श्वान पथक पाचारण करण्यात आले. यावेळी तपासाला गती येऊन यश आले. मृतक संगीत राजाराम इंगळे (वय 49) याचा मुलगा विपुल संगीत इंगळे याला पोलिसांनी ताब्यात घेत विचारपूस केली असता माझा बाप दारू पिऊन मारहाण करून त्रास देत होता. याच त्रासाला कंटाळून याने त्याचे साथीदारासह मृतक यास धारदार शस्त्राने डोक्याचे डावे बाजूला कानाचेवर मारून मृत्यू होण्यास कारणीभूत ठरला.

पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने मृतक याला त्याचे साथीदारासह दुचाकीवर आणून वरवट बकाल ते संग्रामपूर मार्गावर बकाल यांच्या शेता समोरील रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याचा कबुली दिली. या घटनेबाबत वरवट बकाल येथील पोलिस पाटील शुध्दोधन इंगळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी विपुल इंगळे यास अटक करून सदर आरोपी विरुद्ध तामगाव पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर त्याचा एक साथीदार फरार झाला आहे. यावेळी मयत संगीत इंगळे यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात येऊन, सायंकाळी अंत्यविधी करण्यात आले. या घटनेदरम्यान मलकापूर येथील एसडीपीओ आयपीएस अधिकारी अभिनव त्यागी यांनी भेट दिली. त्यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक श्री. उलेमाले यांच्यासह तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत विखे, वरवट बीट जमादार दयाराम कुसुंबे यांच्यासह तामगाव पोलिस फरार आरोपी याचा शोध घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russia Ukraine War : रशियाचा भारतीय कंपनीच्या औषध प्रकल्पावर ड्रोन हल्ला; एकाचा मृत्यू, मोठे नुकसान

माढ्यात आढळला दीडशे वर्षे 'लुप्त' मानल्या गेलेल्या प्रजातीतील जीव; ३६० अंशात पाहणारा 'इंद्रधनुष्य कोळी' शोधला!

Delhi News: जंतर-मंतरवर आंदोलनात खळबळजनक घटना! पोलिसांकडून महिला पत्रकाराचा लैंगिक छळ

Latest Marathi News Live Update : पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संपर्क असल्याच्या आरोपावरून गुवाहाटीत तरुणाला अटक

Stone Crusher: मलठणमध्ये स्टोन क्रशरच्या ब्लास्टिंगचा फटका; शेतजमिनींसह हजारो फळझाडांचे नुकसान

SCROLL FOR NEXT