तिरोडा वनपरिक्षेत्रात मादी बिबटचा मृत्यू sakal
विदर्भ

गोंदिया : तिरोडा वनपरिक्षेत्रात मादी बिबटचा मृत्यू

शेतात एक बिबट मृतावस्थेत असल्याची माहिती

सकाळ वृत्तसेवा

गोंदिया : तिरोडा वनपरिक्षेत्रातील वडेगाव सहसवन क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या लोणारा बिटात सितेपार येथील किसनलाल चैनलाल बघेले यांच्या शेतात शुक्रवारी (ता. २२) सायंकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास मादी बिबट मृतावस्थेत आढळला. या बिबटचा मृत्यू कावीळ आजाराने व जंताच्या प्रादुर्भावाने झाल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.

सितेपार येथील किसनलाल बघेले यांच्या शेतात एक बिबट मृतावस्थेत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार वनपरिक्षेत्राधिकारी एस. के. आकरे, क्षेत्र सहायक एम. एम. कडवे व इतर वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. दरम्यान, उपवनसंरक्षक गोंदिया व पशूधन विकास अधिकाऱ्यांच्या चमूला माहिती देण्यात आली. मात्र, काल अंधार झाल्याने समोरील प्रक्रिया करता आली नाही. म्हणून त्याच ठिकाणी बिबटचे मृत शरीर सुरक्षित ठेवण्यासाठी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सदर मृत बिबट मादी असून एक वर्षापेक्षा कमी वयाची असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, आज शनिवारी सितेपार येथे पशूधन विकास अधिकारी डॉ. विवेक गजरे, डाॅ. रेणुका शेंडे, डाॅ. देवेंद्र कटरे यांच्या चमूने बिबटचे शवविच्छेदन केले. यावेळी सहायक वनसंरक्षक आर. आर. सदगीर, तिरोडा येथील वनपरिक्षेत्राधिकारी एस. के. आकरे तसेच मानद वन्यजीव रक्षक मुकुंद धुर्वे उपस्थित होते. मृत बिबटचे सर्व अवयव जशास तसे होते. सदर बिबट्याचा मृत्यू कावीळ आजाराने व जंताच्या प्रादुर्भावाने झाला असावा, असा अंदाज पशूधन विकास अधिकाऱ्यांच्या चमूने वर्तविला आहे. वैद्यकीय परीक्षणासाठी मृत बिबटच्या अवयवाचे नमुने घेण्यात आले. शवविच्छेदन कारवाई पूर्ण झाल्यानंतर मृतदेह दफन करण्यात आला.

वन्यप्राणी एखाद्या दुर्धर आजाराने वनामध्ये आजारी पडल्यास त्यांच्यावर सहजासहजी उपचार करणे शक्य होत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडतात.

- एस. के. आकरे, वनपरिक्षेत्राधिकारी वनविभाग, तिरोडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT