Murder Murder
विदर्भ

वृद्धाला जाळल्याचे प्रकरण : पन्नास रुपयाच्या दुधातून घडले जळीतकांड

केवळ पन्नास रुपयांच्या दुधातून वृद्धाला जिवंत जाळल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

वर्धा : आर्वीतील नांदपूर येथे वृद्धाला जिवंत जाळल्याचा प्रकार सोमवारी (ता. २८) घडले. यात पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांनी केवळ पन्नास रुपयांच्या दुधातून वृद्धाला जिवंत जाळल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. अभिमान पखाले (वय ६७) रा. नांदपूर असे मृताचे नाव आहे. तर प्रमोद सूर्यभान दाहट, सुभाष मारोती पखाले, मारोती कोरकु पखाले अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. (Vidarbha Crime News)

अभिमान पखाले याच्याशी रविवारी (ता.२७) दूध विकत आणण्याच्या कारणावरून मारोती पखाले याचा वाद झाला होता. सोमवारी मारोती पखाले यांच्या घरी दारू आणि मटणाची पार्टी होती. आश्रयाला असलेल्या अभिमान पखाले यालाही त्या पार्टीत सहभागी करण्यात आले. सर्वांनी मद्यप्राशन केल्याने दुधासाठी दिलेल्या ५० रुपयांच्या कारणावरून प्रमोद दाहट, मारोती पखाले, धर्मा पखाले यांनी अभिमान पखाले यांच्याशी वाद घातला. हा वाद विकोपाला गेल्याने अभिमान पखाले याला मारहाण करण्यात आली. यात तो अर्धमेला झाला. अशा अवस्थेत असताना त्याच्यावर रॉकेल टाकून त्याला जाळण्यात आले.

या प्रकरणी संशयीत प्रमोद दाहट, मारोती पखाले, धर्मा पखाले यांना पोलिसांनी सोमवारी (ता. २८) ताब्यात घेतले. रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंद केल्या नंतर मंगळवारी (ता. एक) न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसाची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली. या प्रकरणी त्या घरातून चौकशीत रॉकेलच्या तेलाची डबकी, जळालेले कापडाचे तुकडे हस्तगत करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळूंखे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार भानुदास पिदूरकर करीत आहेत.

दूध आणण्याच्या कारणावरून झालेला वाद विकोपाला गेल्याने त्याला प्रथम मारहाण केली. तो अर्धमेल्या अवस्थेत असताना त्याला जाळून मारण्यात आले असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. तपासासाठी न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. नेमके काय ते तपासात समोर येईल.

- भानूदास पिदूरकर, ठाणेदार, आर्वी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुरुंगातून सुटल्यानंतर संतोष पंडित यांचा पहिला व्हिडीओ, रस्त्यात खड्ड्याला घातला हार; पाहा video

IND vs JPN: ३२ धावा करूनही भारताने जपानला हरवलं! २ धावांच्या थरारक विजयासह टीम इंडियाने रचला असा वर्ल्ड रेकॉर्ड, जो आजपर्यंत कुणालाच जमला नाही

PPF की NPS? दरमहा 5000 रुपयांच्या गुंतवणुकीतून उभे राहतील दीड कोटी रुपये; जाणून घ्या संपूर्ण गणित

Marathi News Live Updates: पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

SCROLL FOR NEXT