corona virous 
विदर्भ

या जिल्ह्यातही केला कोरोनाने शिरकाव; महिला रुग्ण आढळली पॉझिटिव्ह 

सकाळ वृत्तसेवा

भंडारा : तालुक्‍यातील गराडा येथील 45 वर्षीय महिला रुग्णाचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही जिल्ह्यातील पहिलीच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहे. त्यामुळे नागरिकांसह प्रशासनानेही चिंता व्यक्त केली आहे. ही महिला ज्या भागातील रहिवासी आहे, त्या परिसरातील पाच किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला असून, चार ते पाच गावांतील नागरिकांना घरातच थांबावे लागणार आहे. संबंधित कुटुंबीय व संपर्कात आलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांची तपासणी करण्यात येत आहे. 

गराडा येथे नातेवाईकाकडे आलेली महिला क्षयरोगावर उपचार घेत आहे. ती गेल्या एक महिन्यापासून गराडा (बासोरा) येथे राहत आहे. या महिलेची कोरोना तपासणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, याबाबत सोशल मीडियावर वेगवेगळ्या बातम्या पसरल्या आहेत. प्रशासनाने सदर महिला रुग्णाला आयसोलेशन वॉर्डात दाखल केले असून, तिच्या कुटुंबीयांचे नमुनेही तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. 

गराडा येथील महिला रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे प्रशासनाकडून गराडा, गराडा बुज., मेंढा, बासोरा बोरगाव (पुनर्वसन) या पाच किलोमीटरचे क्षेत्र कॅटेन्मेंट झोन म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे या भागातील लोकांना घरातच थांबून राहावे लागणार असून त्यांना घरपोच जीवनाश्‍यक वस्तू व औषधांचा पुरवठा करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांनी सांगितले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Microsoft Layoff: टेक क्षेत्रात पुन्हा मोठा धक्का! मायक्रोसॉफ्टने ४,८०० कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; एचआर प्रमुखांनी थेट कारणच सांगितलं

Raigad District Rain : रायगड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

Rajgad Rain : राजगड तालुक्यातील पासली खोऱ्यातील बालवड पूल पाण्याखाली; परिसरातील नागरिकांचा संपर्क तुटला

Mumbai Pune Railway Close : मुंबई-पुणे रेल्वे १५ तासांहून अधिक काळ ठप्प; सेवा केव्हा सुरू होणार?

ZIM vs BAN, ODI: झिम्बाब्वेने केला बांगलादेशचा गेम! चुरशीच्या लढतीत धूळ चारत मालिकेत घेतली आघाडी

SCROLL FOR NEXT