file photo
file photo 
विदर्भ

बुटीबोरी नगर परिषदेची पहिली निवडणूक आज

सकाळ वृत्तसेवा

बुटीबोरी :  बुटीबोरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रचारतोफ थंड झाली आहे. उद्या, रविवारी (ता. 23) प्रथमच होत असलेल्या निवडणुकीमुळे वातावरण सर्वत्र निवडणूकमय झाल्याचे एकंदरीत चित्र आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणुकीत तिरंगी लढत असली, तरीही अपक्षांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरू शकते.
बुटीबोरीत सात उमेदवार नगराध्यक्षपदाकरिता, तर 61 नगरसेवकपदांकरिता निवडणुकीत उभे आहेत. आमदार समीर मेघे भाजप-शिवसेना-रिपाइंच्या युतीअंतर्गत भाजप मजबूत करण्याकरिता कंबर कसून कामाला लागले आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांच्या अनेक सभा बुटीबोरी परिसरात पाहायला मिळाल्या. माजी आमदार रमेशचंद्र बंग यांनीसुद्धा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष बळकट करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. अपक्ष नगराध्यक्षपदाचे उमेदवार तुषार डेरकर यांच्या प्रचाराकरिता आमदार बच्चू कडू यांनीही बुटीबोरीत हजेरी लावली. कॉंग्रेस पक्षाकरिता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनीही प्रचारावर जोर दिला आहे. त्यामुळे बुटीबोरी नगर परिषदेच्या निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
सर्व उमेदवारांच्या समक्ष ईव्हीएम टेस्ट करण्यात आली. बूथरचनेचा आराखडा या ठिकाणी आखण्यात आला. प्रभारी मुख्य अधिकारी मनोज देसाई व राज्य निवडणूक आयोगाचे अनेक पदाधिकारी, कर्मचारी या वेळी उपस्थित होते. पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मतदान सकाळी 7.30 पासून सुरू होईल. सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान करता येईल. मतमोजणी सोमवारी (ता. 24) स्व. किशोरभाऊ वानखेडे सभागृहात सकाळी 10 वाजतापासून सुरू होईल. बुटीबोरीची निवडणूक ही दिग्गज नेत्यांकरिता अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. त्यामुळेच सर्वपक्षीय नेत्यांचे लक्ष बुटीबोरी नगर परिषद निवडणुकीकडे लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Unnatural Sex: "पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध बलात्कार नाही"; हायकोर्टाचं विधान!

Sharad Pawar: सोडून गेलेल्यांबाबत तडजोड नाही, पवार थेटच बोलले; वाचा महत्वपूर्ण मुलाखत

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : रविवारी मध्यरेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल !

SCROLL FOR NEXT