File photo
File photo 
विदर्भ

फवारणी बाधित पाच रुग्ण गंभीर; 14 जणांवर उपचार

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : पिकांवर फवारणी करताना विषबाधा झालेल्या पाच गंभीर रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. असे एकूण 14 फवारणी बाधित शेतकरी व शेतमजूर उपचारासाठी दाखल आहेत. गेल्या पंधरवड्यात सहा जणांवर उपचार करून वैद्यकीय महाविद्यालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
किडींपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी किटकनाशकांच्या फवारणीचा जोर वाढला आहे. पिकांची वाढ होत असतानाच किडींपासून संरक्षण करण्यासाठी शेतकरी फवारणी करीत आहेत. जिल्हा प्रशासनाकडून सुरक्षाकिट उपलब्ध करून दिल्याचा दावा करण्यात येत असला तरी शेतमजूर किटचा वापर करताना दिसत नाहीत.
ऑगस्ट महिन्याच्या 12 तारखेपासून फवारणीमुळे विषबाधा झालेले रुग्ण वैद्यकीय महाविद्यालयात दाखल होणे सुरू झाले. आतापर्यंत एकूण 20 शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झाल्याची नोंद आहे. त्यापैकी सहा जणांना उपचाराअंती सुट्टी देण्यात आली. तर, 14 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असून, डॉक्‍टरांच्या विशेष पथकाकडून उपचार करण्यात येत आहेत. खरीप हंगामात नेर तालुक्‍यात फवारणीने एका शेतकऱ्याचा बळी घेतला. दोन वर्षांपूर्वी किटकनाशकांच्या फवारणीने तब्बल 22 शेतकरी व शेतमजुरांचा बळी घेतला. हजारो बाधित झालेत. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने केलेल्या जनजागृतीमुळे गेल्या वर्षी एकही मृत्यू झाला नाही. ऑगस्ट महिन्यात फवारणीच्या कामाला वेग येताच रुग्ण उपचारासाठी दाखल होऊ लागले आहेत. दरम्यान, घटनेची गंभीरता लक्षात घेता गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, सीईओ जलज शर्मा यांनी रुग्णालयात भेट देऊन अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार यांच्याकडून आढावा घेतला. अनेकदा व्यक्ती सलग दिवसभर काळजी न घेता फवारणी करतात. वाऱ्याची दिशा ओळखून फवारणी केली जात नाही. वारंवार प्रशासनाकडून सुरक्षाकिटचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत असले तरी त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी फवारणीमुळे विषबाधा होण्याचा धोका वाढतच चालला आहे.

माहितीसाठी विशेष चार्ट
फवारणी करताना नेमकी बाधा कोणत्या कारणाने झाली, हे जाणून घेण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने विशेष चार्ट बनविला आहे. त्यात रुग्णाचे नाव, गाव, मोबाईल क्रमांक, कोणते औषध फवारले, सुरक्षाकिट वापरली की नाही, प्राथमिक उपचार कुठे घेतले आदी माहिती संकलित केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Kangana Ranaut: कंगनानं थेट बिग बींसोबत केली स्वत:ची तुलना; भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले..."

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Manisha Koirala : उमरावजान साकारणार होती मल्लिकाजान ? मनीषाने सांगितली 18 वर्षांपूर्वीची गोष्ट

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

SCROLL FOR NEXT