Nitin Raut
Nitin Raut esakal
विदर्भ

इरई धरणावर होणार तरंगते सौर ऊर्जा पार्क

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर - येथील इरई धरणावर १०५ मेगावॅटचे तरंगते सौर ऊर्जा पार्क उभारण्यात येणार आहे. यासंदर्भात मंगळवारी (ता. १४) ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीत ऊर्जामंत्री कार्यालयात आढावा बैठक पार पडली. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च ५८० कोटी रुपये अपेक्षित आहे. पंधरा महिन्यात हा प्रकल्प उभा राहणार आहे. यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने चंद्रपूर येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्राला पाणीपुरवठा करण्यासाठी हे धरण बांधलेले आहे. यातून चंद्रपूर शहरालाही पाणीपुरवठा करण्यात येते. या सौर ऊर्जा पार्कची निर्मिती करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार असून पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य ठिकाण ठरणार आहे. या ऊर्जा पार्कचे पर्यटकांना अवलोकन करता यावे यासाठी गॅलरी व सेल्फी पॉईंटचे बांधकाम करण्यात येणार आहे.

चंद्रपूर औष्णिक वीज निर्मिती केंद्रात वाघांचा व बिबट्यांचा वावर असल्याने कर्मचारी व पर्यटकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महानिर्मिती व्यवस्थापनाला दिलेत. या बैठकीला महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, मराविम सूत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे, महानिर्मितीचे संचालक संचलन चंद्रकांत थोटवे व इतर अधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT