Foot Petroling Of Police Start In Nagpur City
Foot Petroling Of Police Start In Nagpur City 
विदर्भ

पोलिसांची शहरात 'फूट पॅट्रोलिंग' सुरू; गुन्हेगारांत दहशत

अनिल कांबळे

नागपूर - शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांनी 'फूट पॅट्रोलिंग' सुरू केली आहे. गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा हा उद्‌देश ठेवून पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ठाणेदारांना आदेश दिले होते. शहरातील सामान्य नागरिकांचा पोलिसांवरील विश्‍वास अधिक दृढ करण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. 

सण-उत्सवांच्या दिवसात शहरात शांतता कायम राहावी, यासाठी ठाण्यात बसून पोलिसींग करता येणार नाही, ही बाब हेरून पोलिस आयुक्‍त डॉ. उपाध्याय यांनी ठाणेदारांना 'फूट पॅट्रोलिंग'वर भर देण्याचे आदेश दिले होते. गणेशोत्सव, दुर्गोत्सव, मोहरम आणि दसरा या सणादरम्यान शहरातील धार्मिक वातावरण असते. याचा फायदा घेऊन काही असामाजिक तत्व सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करू शकतात. तसेच पोलिस कर्मचारी केवळ पोलिस ठाण्यातून काम केल्यास, गुन्हेगारी प्रवृत्तीला रान मोकळे असल्याचा भास होईल. त्यामुळे ठाणेदाराने स्वतः आपल्या हद्‌दीत रात्रीची पायी गस्त घालण्याचा नवीन 'फंडा' आयुक्‍तांनी दिला. याचा सकारात्मक परिणामही पोलिस विभागाला दिसत आहे. पोलिस रात्रीच्या वेळी रस्त्यावर दिसत असल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे तर गुन्हेगारांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. आता मध्यरात्रीनंतरही पोलिस कर्मचारी रस्त्यावर दिसत आहेत. त्यामुळे 

फूट पॅट्रोलिंग हा बेसीक पोलिसींगचा आत्मा आहे. रस्त्यावर पोलिस दिसल्यास सर्वसामान्यांना पोलिसांच्या कार्यप्रणालीची जाणीव होते. असामाजिक प्रवृत्तीमध्ये वचक निर्माण होते. यापुढेही शहरात पायी गस्त पोलिस अधिकारी घालतील. पोलिस 'सद्ररक्षणाय'साठी कटिबद्ध आहेत. 
- डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलिस आयुक्‍त 

पोलिस आयुक्‍तांच्या आदेशामुळे पायी गस्त प्रणालीवर जास्त भर देण्यात येत आहे. त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. अनेकांच्या मनात पोलिसांविषयी आदरयुक्‍त भीती निर्माण झाली आहे. परिसरात पायी गस्त घालण्यामुळे सर्वसामान्यांशी संपर्क वाढला आहे. 
- वैभव जाधव, ठाणेदार, तहसील पोलिस स्टेशन 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT