कोतेवाडा: येथील गोपाल डेकाटे यांच्याकडील चोरट्यांनी फोडलेली आलमारी. 
विदर्भ

कोतेवाडा येथे एकाच रात्री चार घरफोड्या 

सकाळ वृत्तसेवा

गुमगाव (जि.नागपूर) : हिंगणा तालुक्‍यातील कोतेवाडा येथे चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी केल्याचा प्रकार सोमवारी रात्री घडला. मंगळवारी पहाटे 4 वाजता हा प्रकार उघड होताच ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली. या चारही घरफोड्यांमध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह अंदाजे 1 लाख 73 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. 
कोतेवाडा येथे शेतमजुरी करून कुटुंबीयांचे पालनपोषण करणारे गोपाल बालाजी डेकाटे कुटुंबीयांसह सोमवारी रात्री गाढ झोपेत असताना चोरट्यांनी मागच्या दाराने घरात प्रवेश केला. त्यांच्याकडील 3 तोळ्याची सोन्याची पोत, 3 ग्रॅम सोन्याची नथ, 4 ग्रॅम काळ्या मण्याची सोन्याच्या पोतसह अंदाजे 1 लाख 23 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. त्यांच्याच बाजूला थोरेश्वर चंद्रभान बावणे यांच्याकडे 4 ग्रॅम सोन्याच्या बिऱ्या आणि भारत नारायण कुंभारे यांच्याकडील नगदी 20 हजारांवर चोरट्यांनी डल्ला मारला. भोलानाथ बेलखोडे यांच्याकडील नगदी 3 हजारावर चोरट्यांनी डाव साधला. एकाच रात्री झालेल्या या घरफोड्यांमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले असून या घरफोडीमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
चोरांची नवी शक्कल 
चोरट्यांनी चोरी करताना आजूबाजूच्या घराची दरवाजे बाहेरून कडी आणि दोरीने बांधून बंद केली. जेणेकरून घरातील कोणीही जाग आल्यास ओरडत मदतीसाठी घराच्या बाहेर पडणार नाही.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NTA Exam Calendar 2026-27 Out : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! जेईई मेन, यूजीसी-नेटसह प्रमुख परीक्षांच्या तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Shivsena Case : शिंदे गटाला पक्ष, धनुष्यबाण चिन्ह देताना कोणते निकष? सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला थेट सवाल, सुनावणीत नेमकं काय घडलं?

'कौलारू माडी गं, हिरव्या बागा कोकणा...' गाण्यावर वर्षा उसगावकर, किशोरी शहाणे यांचा जबरदस्त डान्स; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणतात-

Latest Marathi News Update : 'निवडणूक आयोगाला आपली घटनात्मक कर्तव्ये पार पाडण्यापासून अनिश्चित काळासाठी रोखले जाऊ शकत नाही'

Manoj Jarange Patil: "विषय फिट बसला!" 58 लाख नोंदींवर जरांगेंचा मोठा दावा

SCROLL FOR NEXT