Goat Group Allocation Scheme 
विदर्भ

Agriculture News : 'यामुळे' शेळी गट वाटप योजनेचा निधी जाणार परत; अनेक गटांचे लाभार्थी वंचित

सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागातर्फे राबविली जाणारी शेळी गट वाटप योजनेसाठी शासनाकडून प्राप्त दोन कोटीचा निधी योजनेचा कालावधी पूर्ण झाल्याने शासनाकडे परत करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे १० टक्के लाभार्थी हिस्सा भरूनही लाभ न मिळाल्याने लाभार्थी योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

ग्रामीण भागात स्वयंरोजगार उपलब्ध व्हावे व नागरिकांचे उत्पन्नाचे स्‍त्रोत वाढावे या उद्देशाने राज्य सरकार ग्रामीण भागात विविध योजना राबवित आहे. त्याच अनुषंगाने दुग्धव्यवसायाच्या माध्यामातून स्वयंराेजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून शेळी गट वाटप योजना राबविण्यात आली होती.

वैयक्तिक लाभाच्या या याेजनांसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. जिल्हा परिषदेच्या पशुंसवर्धन विभागातर्फे अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी ही योजना प्रस्तावित हाेती. यात १० शेळी व एक बाेकूड देण्याचे प्रस्तावित हाेते. त्यासाठी शासनस्तरावरून सन २०२१-२२ साठी पाच काेटीचा निधी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाला मंजूर करण्यात आला होता.

त्यातून जिल्ह्यातील ८५२ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. पैकी ३६४ लाभार्थ्यांची त्यांचा १० टक्के लाभार्थी हिस्साही भरला हाेता. या योजनेचा लाभ मिळण्यापूर्वीच योजनेची दाेन वर्षांची मुदत संपल्यामुळे निधी शासनाकडे परत करण्याची वेळ जिल्हा परिषद प्रशासनावर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New aviation Rules For Pets : विमानात आता पाळिव प्राणी नेण्याबाबत नवीन सूचना जारी, हवाई वाहतूक मंत्रालयाने विमान कंपन्यांना दिले नवे आदेश

New IPO: गॅस संकटात ऊर्जा क्षेत्रातील या कंपनीचा 1,100 कोटींचा IPO! किती गुंतवणूक करावी लागणार? काय आहे कंपनी? जाणून घ्या

यंदाचा गुढीपाडवा ठरणार 'या' चार राशींना भाग्यशाली; सुरू होणार सुवर्णकाळ पण या राशींनी राहा सावध

IPL 2026 : आधी, नो लूक षटकार... मग कॉलर टाईट... हार्दिक पांड्याचा माज जसप्रीत बुमराहने तिसऱ्या चेंडूवर ठेचला Video Viral

Navi Mumbai: आदल्या दिवशी वाद; नंतर तलवार घेऊन तरुण हॉटेलमध्ये घुसला अन्... नवी मुंबईत मॅनेजरसोबत काय घडलं?

SCROLL FOR NEXT