maoists sakal
विदर्भ

Women Maoist Surrender : जहाल महिला माओवाद्याची पोलिसांपुढे शरणागती

सरकारने तब्बल ११ लाख रुपये बक्षीस जाहीर केलेल्या महिला माओवाद्याने नक्षल चळवळीतील हिंसाचाराला कंटाळून गडचिरोली पोलिस दलापुढे शरणागती पत्करली.

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली - सरकारने तब्बल ११ लाख रुपये बक्षीस जाहीर केलेल्या महिला माओवाद्याने नक्षल चळवळीतील हिंसाचाराला कंटाळून गडचिरोली पोलिस दलापुढे शरणागती पत्करली. रजनी ऊर्फ कलावती समय्या वेलादी (वय २८) रा. ईरुपगुट्टा, पो. भोपालपट्टनम, जि. बिजापूर (छत्तीसगड) असे आत्मसमर्पण केलेल्या महिला माओवाद्याचे नाव आहे.

रजनी ऊर्फ कलावती वेलादी हिने पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्यापुढे आत्मसमर्पण केले. रजनी वेलादी ऑगस्ट २००९ ला फरसेगड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन २०१० पर्यंत कार्यरत होती. २०१० ला ओरच्छा दलममध्ये बदली होऊन २०१३पर्यंत कार्यरत होती. २०१३ ला नॅशनल पार्क एरीया डॉक्टर टीममध्ये बदली होऊन एसीएम (एरीया कमीटी मेंबर)पदावर पदोन्नती होऊन २०१५ पर्यंत कार्यरत होती.

२०१५ ला सांड्रा दलममध्ये बदली होऊन आजपर्यंत त्याच दलममध्ये कार्यरत होती. या कार्यकाळात २०१५ मध्ये गुंडम जंगल परिसरातील चकमक, २०१७ मध्ये बेज्जी ते येर्रागुफा मार्गावरील अॅम्ब्युश/चकमकीमध्ये सहभाग. यात डीआरजी (छत्तीसगड) चे १२ पोलिस जवान शहीद झाले होते.२०१८ मध्ये मारेवाडा जंगल परिसरातील चकमक, २०१९ मध्ये बोरामज्जी जंगल परिसरातील चकमकीमध्ये तिचा सहभाग होतो.

२०२०-२१ मध्ये उपराल (छत्तीसगड) येथील एका व्यक्तीच्या खुनात तिचा प्रत्यक्षरित्या सहभाग होता. तसेच २०१८ मध्ये मौजा बेद्रे रोडवर सरकारी बसची जाळपोळ करण्यातही तिचा सहभाग होता. महाराष्ट्र शासनाने रजनी ऊर्फ कलावती समय्या वेलादीवर ६ लाख रूपयांचे व छत्तीसगड सरकारने ५ लाख रुपयांचे असे एकूण ११ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. आता आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरिता तिला केंद्र व राज्य शासनाकडून एकूण ४ लाख ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत.

आतापर्यंत ५८६ जण शरण...

शासनाने जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत आत्मसमर्पण केले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलिस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकूण ५८६ माओवाद्यांनी गडचिरोली पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे.

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने नक्षलवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने २०२२ ते २०२३ या एका वर्षात आतापर्यंत एकूण १३ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास इच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलिस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करून शांततेचा मार्ग स्विकारावा असे आवाहन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Traffic: गोकुळाष्टमी आणि दहीहंडी उत्सवानिमित्त मुंबईत वाहतूक बदल; 'या' भागात प्रवेश बंदी, वाचा सविस्तर...

Viral Video: कुलूप उघडण्याची अनोखी पद्धत! चोराचा लाईव्ह डेमो पाहून पोलीसही अवाक्... पाहा व्हिडिओ

Pawandeep Rajan : अपघाताच्या 3 महिन्यानंतर 'इंडियन आयडल 12' चा विजेता पवनदीप कसा आहे? म्हणाला माझा जीव....

निशांची मधील पहिले गाणे 'डिअर कंट्री' प्रदर्शित! तबल्याच्या ठेक्यांसह हार्मोनियमच्या सूरांनी केले मनात घर

Malegaon Crime : मालेगाव पोलिसांची मोठी कारवाई; ३० दुचाकी चोरणाऱ्या ५ जणांना अटक

SCROLL FOR NEXT