Guns
Guns Sakal
विदर्भ

Gadchiroli News : जंगलात आढळलेल्या ‘त्या’ तीन बंदुका नेमक्या कोणाच्या?

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली - कुरखेडा तालुक्यातील ग्यारापत्ती येथील घनदाट जंगलात रविवार (ता. ३) राज्य राखीव पोलिस दल व ग्यारापत्ती पोलिसांच्या नक्षलविरोधी अभियानादरम्यान तीन जुन्या बनावटीच्या भरमार बंदुका आढळून आल्याने खळबळ उडाली. यावेळी पोलिसांनी तीन बंदुका जप्त केल्या आहेत.मात्र या बंदुका कुणाच्या हे अद्याप कळू शकले नाही.

जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातल्या ग्यारापत्तीच्या जंगलात एका झोपडीत आढळलेल्या तीन जुन्या पद्धतीच्या भरमार बंदुका नेमक्या कोणाच्या याचा शोध अद्याप लागलेला नाही. त्या नक्षलवाद्यांच्या असल्याचा कयास बांधल्या जात असला, तरी नक्षलवादी असे बंदुका सोडून जातात का, अशी शंकाही उपस्थित केली जात आहे.

जिल्ह्यात शिकारीसाठी अनेक लोकांकडे अशा पद्धतीच्या बंदुका वापरल्या जातात. अलिकडे पोलिसांच्या आवाहनानुसार बऱ्याच लोकांनी त्या बंदुका पोलिसांकडे जमा केल्या आहेत. मात्र अजूनही अनेक लोकांकडे बंदुका असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रविवारी केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान आणि जिल्हा पोलिस दलाच्या नक्षलविरोधी पथकाच्या संयुक्त गस्तीदरम्यान या बंदुका दिसल्या. त्यामुळे परिसरात नक्षलवादी असण्याची शक्यता व्यक्त करत शोधमोहीम तीव्र करण्यात आली, पण कोणीही आढळले नाही.

यासंदर्भात पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांना विचारणा केली असता या प्रकरणाचा तपास सुरू असून ज्याच्या झोपडीत या बंदुका मिळाला त्या अनुषंगाने चौकशी करण्यात येत असल्याची माहिती दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT