बोलेपल्ली : पोलिसांनी अटक केलेला युवतीचा मारेकरी जयदेव सरदार.  
विदर्भ

गडचिरोलीत एका प्रेयसीने केली लग्नाची मागणी अन् घडले विपरीतच...आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा

मुलचेरा (जि. गडचिरोली) : गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या पुल्लीगुडम येथील प्राची बारसागडे या युवतीच्या हत्येच्या प्रकरणात प्रमुख सूत्रधार असलेला जयदेव सरदार अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. त्यामुळे या खुनाच्या प्रकरणाचे महत्त्वाचे धागेदोरे तसेच सहभागी लोकांची नावे समोर येण्याची शक्‍यता आहे.

मुलचेरा तालुक्‍यातील बोलेपल्ली पोलिस मदत केंद्र हद्दीतील पुल्लीगुडम येथील प्राची बारसागडे हिचा मृतदेह 12 जूनला गावशिवारातील विहिरीत आढळून आला होता. या प्रकरणी प्रियकरानेच धक्का दिला असल्याने विहिरीत पडून तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ही माहिती अन्य दुसऱ्या एका जोडप्याने दिली होती. त्यामुळे प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली.

जयदेव निरंजन सरदार (वय 22) व पवन दयाल जुलुमे (वय 22) या दोघा युवकांचे पुल्लीगुडम येथील दोन युवतींसोबत प्रेमसंबंध होते. हे दोघेही पुल्लीगुडम येथे युवतींना भेटायला गेले होते. पुल्लीगुडमपासून जवळपास एक किमीवर असलेल्या शेतशिवारात त्यांची भेट झाली. दोन्ही जोडपे एकच परिसरात मात्र, वेगवेगळ्या ठिकाणी उभे होते. बराच वेळ गप्पागोष्टींत रंगलेल्या प्राची व तिचा प्रियकर जयदेव यांच्यात अचानक भांडण झाले. त्यानंतर रागाच्या भरात जयदेवनेच प्राचीला विहिरीत धक्का दिल्याची माहिती पवन व त्याच्या प्रेयसीने दिली होती.

आरोपी दहा दिवस होता फरार

मात्र, घटनेनंतर जयदेव सरदार गेले दहा दिवस फरार होता. बोलेपल्ली पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी श्रीकांत चव्हाण यांनी या प्रकरणात फरार असलेला आरोपी जयदेव सरदार याला अटक केली. जयदेव सरदार हा 12 जूनपासून फरार होता. तो तेलंगाणा राज्यातून घरच्यांना भेटायला येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच बोलेपल्ली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अहेरी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

प्रकरणाचा लवकरच उलगडा होणार

त्यामुळे पोलिस तपासादरम्यान प्राची हत्याकांडातील प्रकरणाचा लवकरच उलगडा होणार आहे. प्राणहिताचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया आणि एटापल्लीचे उपविभागीय अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनात बोलेपल्ली पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी श्रीकांत चव्हाण पुढील तपास करीत आहेत.

लग्नावरून दोघांत कडाक्‍याचे भांडण

प्राची व जयदेव यांच्यात गेल्या काही दिवसांपासून प्रेमसंबंध सुरू होते. त्यामुळे कुटुंबीयांच्या नजरेआड त्यांच्या सातत्याने भेटीगाठी होत होत्या. या दोघांच्या प्रेमप्रकरणाची पुल्लीगुडम गावात चर्चा होती. त्या दोघांच्या कुटुंबीयांनाही त्यांच्या प्रेम प्रकरणाची भनक लागली होती. त्यामुळे प्राचीने जयदेवकडे लग्नाचा हट्ट धरला. ज्या दिवशी प्राचीची हत्या झाली. त्या दिवशीसुद्धा लग्नावरून दोघांत कडाक्‍याचे भांडण झाले आणि यातूनच जयदेवने प्राचीला संपविले, अशी शंका आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT