गडचिरोली : येथील समस्याग्रस्त जिल्हा महिला व बाल रुग्णालय.
गडचिरोली : येथील समस्याग्रस्त जिल्हा महिला व बाल रुग्णालय. 
विदर्भ

गडचिरोली ः सफाई कामगारावर उपासमारीची वेळ

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : रुग्णांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गडचिरोली येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात कार्यरत कंत्राटी सफाई कामगारांना मागील दोन वर्षांपासून मानधन मिळाले नाही. यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीचा प्रसंग ओढवला आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाप्रती संताप व्यक्त केला जात आहे.
गडचिरोली येथे दोन वर्षांपूर्वी जिल्हा महिला व बाल रुग्णालय सुरू करण्यात आले. येथील पदे काही कंत्राटदाराच्या मार्फतीने तर काही आरोग्य विभागाकडून भरण्यात आले. मात्र अद्याप अनेक पदे रिक्त असल्याने त्याचा आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे. रुग्णालयातील दैनंदिन स्वच्छतेसाठी आरोग्य विभागाने 20 सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली; परंतु सेवेत रुजू झाल्यापासून या कर्मचाऱ्यांना एकदाही मानधन मिळाले नाही. आज ना उद्या कामाचा मोबदला मिळेल या आशेवर कर्मचारी सेवा
देत आहेत. या समस्येमुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक समस्या बिकट झाली आहे. नोकरीवर असल्याने किराणा व अन्य दुकानातून उधारीवर सामान मिळत होते. मात्र गेल्या काही दिवसापासून तेही बंद झाल्याने त्यांच्या कुटुंबावर आता उपासमारीचा प्रसंग ओढवला आहे.
वेतनासाठी निधी कधी मिळणार
नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला विकास कामासाठी शासनाकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात निधी मिळतो. यामध्ये रस्ते बांधकाम, पुलाची निर्मिती, नक्षल निर्मूलन जनजागृती आरोग्य व शिक्षणाचा समावेश आहे. गडचिरोली येथील जिल्हा व महिला बाल रुग्णालयात कंत्राटदारांकडून कंत्राटी पद्धतीने काही पदे भरण्यात आली. मात्र अनेक पदे अद्याप रिक्त असल्याने त्याचा परिणाम आरोग्य सेवेवर होत आहे. रुग्णालय सुरू झाल्यापासून सफाई कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाकडून आजवर निधी मिळाला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT