संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
विदर्भ

कॅन्सर संस्थेसाठी गडकरींचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः नागपूरच्या मेडिकलमध्ये उभारले जाणारे बहुप्रतीक्षित "कॅन्सर इन्स्टिट्यूट'चे भिजत घोंगडे असल्याचे वृत्त दै. सकाळने प्रकाशित केले. विशेष असे की, 18 महिन्यांत उभारा, असे निर्देश उच्च न्यायालयाने 2017 मध्ये दिले. जून 2019 मध्ये ही मुदत संपली. मात्र, राज्य शासनाने दखल घेतली नाही. अखेर मेडिकलमध्ये कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या उभारणीसाठी नागपूरचे खासदार तसेच भारत सरकारचे मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला आहे. येत्या 7 दिवसांत 20 कोटी रुपये बांधकामासाठी वळते करण्यात येणार आहेत. मंगळवारी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या रामनगर येथील निवासस्थानी झालेल्या बैठकीतून ही माहिती पुढे आली आहे.
नागपूरच्या हिवाळी अधिवेशन काळात 2012 मध्ये मेडिकलमधील कॅन्सरग्रस्तांनी लढा उभारला होता. "सकाळ'ने हा विषय लावून धरला होता. त्यानुसार, तत्कालीन आमदार आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो लढा विधानसभेत पोहोचवला. याची दखल घेत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मेडिकलमध्ये कॅन्सर इन्स्टिट्यूटची घोषणा केली. 2013 मध्ये प्रस्ताव सादर केला. मात्र, पुढे सत्तांतर झाले. भाजप सरकार सत्तेवर आले. मात्र, मेडिकलमधील कॅन्सर इन्स्टिट्यूट औरंगाबादला पळवले. यामुळे मेडिकलच्या कॅन्सर विभागाचे प्रमुख डॉ. कृष्णा कांबळे यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने 18 महिन्यांत कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारण्याचे निर्देश दिले. परंतु, न्यायालयाच्या निर्देशाला "खो' दिला. हे वृत्त अवघ्या पाच दिवसांपूर्वी प्रकाशित केले.
अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष
मेडिकलमधील अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आहेत. त्यांनी कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या प्रकल्पासंदर्भात लोकप्रतिनिधींसह मेडिकल आणि बांधकामाची जबाबदारी असलेल्या नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी (ता. 13) रामनगरच्या निवासस्थानी बोलावली. या बैठकीत नागपूर सुधार प्रन्यासच्या मागणीनुसार शासनाने सुमारे 20 कोटी रुपये वळते करण्याची फाइल वित्त विभागाकडे पाठविली असल्याचे सांगितले. सात दिवसांत निधी वळता होण्याचे संकेत मेडिकलला मिळाले.

कॅन्सर इन्स्टिट्यूटसाठी 20 कोटींचा निधी मिळण्याचे संकेत मिळाले आहेत. निधी मिळाल्यानंतर तत्काळ बांधकाम करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून हा प्रकल्प मार्गी लागत आहे.
-डॉ. सजल मित्रा, अधिष्ठाता, मेडिकल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT